Rural Development: शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतीच्या मशागती जाणे आणि शेतमाल आणण्यासाठी रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेत रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी कायद्यातील तरतुदी आणि समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन ५ एप्रिल रोजी १० ते ५ यावेळेत मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ मंदिर प्रांगणात घेण्याचा निर्णय घेतला आहे..शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे संस्थापक शरदराव पवळे यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात राज्यस्तरीय अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक झाली. मनोहर मतकर, कानिफनाथ कदम, कारभारी गरड, बाबासाहेब थोरात, प्रशांत चौधरी, पोपट शेळके, हरिभाऊ पवार, विठ्ठल निर्मळ, मुक्ताजी चंद, अशोक कचरे, आशाबाई वाघ, उषाबाई हुके, भाऊसाहेब तेलोरे, बाजीराव जगदाळे, विलास जगदाळे, सचिन तलोरे आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते..Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले.अधिवेशनात प्रशासकीय पातळीवरील महसूल, भूमी अभिलेख, पोलिस, तसेच कायदेशीर सल्लागार यांचे चर्चासत्र, चळवळ चालवताना येणाऱ्या विविध समस्या यावर मार्गदर्शन होणार आहे..Farm Roads Development: लातूर, धाराशिव जिल्ह्यांत शेत, पाणंद, शिवरस्त्यांना वेग.ज्या तालुक्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. तेथील प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचा सन्मान आणि ज्या तालुक्यात काम करण्यास समस्या येतात. तेथील समस्यांचे अवलोकन करून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत योग्य उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांशी विचारविनिमय करून निर्णय घेतले जाणार आहेत..प्रत्येक तालुका व जिल्ह्यातील कार्यरत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर येणाऱ्या समस्या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणे चळवळीच्या राज्य कार्यकर्त्याकडे मुद्देसूद पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.