Farmer Issues: कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मार्च एंडिंग’ लोटला तरी सुमारे १० कोटींचे अनुदान प्राप्त झाले नाही. कृषी आयुक्तालायाकडून हा निधी मिळालेला नाही. परिणामी जिल्ह्यात कृषी यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या हजारो शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे..राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत, महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात ५९ हजार ९७ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे..Farm Machinery Subsidy: यंत्रांच्या अनुदानात ८६० कोटींची वाढ .या वर्षात सुरुवातील २०२० शेतकऱ्यांना सात कोटी २७ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. त्यानंतर, २५ मार्च रोजी कृषी आयुक्तालयाकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला ३.३६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. .MahaDBT Subsidy Delay: महाडीबीटी अनुदान रखडले.मात्र, उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अजूनही १० कोटी रुपयांचा निधी येणे बाकी आहे. हा निधी जिल्ह्याला लवकरच मिळेल व शेतकऱ्यांना वितरणी केल्या जाईल, अशी शक्यता अधिकारी लावून बसले आहेत..तांत्रिक अडचणींचा खोडा की वेगळेच कारणशेतकऱ्यांची निवड झालेली असली तरी महाडीबीटी पोर्टलवर टॅब बंद असल्याने पुढील प्रक्रियाच रखडलेली आहे. महाडीबीटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे निधी वितरणात अडथळा आलेसा आहे. अनुदानाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचे समोर आले आहे. ‘पूर्वसंमती’ प्रक्रिया ठप्प झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. पोर्टलवरील टॅब बंद ठेवण्याचे कारण निधी तर नाही ना अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.