Farm Losses: शेतीतील वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला न मिळणारा परवडणारा भाव आणि यंदाच्या संभाव्य अल्पवृष्टीच्या अंदाजामुळे नेर तालुक्यासह ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक शेतकरी स्वतःची जमीन मक्त्याने किंवा निम्मे बटाईने देऊन मुंबई, पुण्यासारख्या शहरांत मजुरीसाठी जात असल्याचे चित्र आहे..बियाणे, खते, कीडनाशके तसेच मजुरीचा खर्च गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढला आहे. त्यातच शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक खर्चाचा बोजा वाढल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्न यातील वाढती तफावत शेती तोट्याची ठरत असल्याची भावना बळकट करीत आहे..Shepherds Migration: पूर्व खानदेशात मेंढपाळ बांधवांचा मुक्काम.यंदा खतांच्या किमतींमध्ये झालेली वाढही शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम खत बाजारावर होत असून, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पुरेसा खतपुरवठा होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. परिणामी अनेकांनी जोखीम टाळण्यासाठी यंदाच्या हंगामात शेती इतरांकडे सोपविण्याचा मार्ग स्वीकारला आहे..साधारणपणे हंगाम संपल्यानंतर शेतमजूर रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करतात. मात्र यंदा पेरणीच्या हंगामातच शेतकरी आणि शेतमजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. मागील अडीच ते तीन महिन्यांपासून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी रोजगारासाठी शहरांची वाट धरली आहे. यामुळे शेतीकामांसाठी स्थानिक मजुरांची उपलब्धता घटण्याची शक्यता असून त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो..Sugarcane Labor Migration Story: ऊस तोडीला जाण्याशिवाय पर्यायच नाही....दरम्यान, जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या निकषांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे. कर्जमाफीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून, कर्जमाफीपेक्षा उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि शाश्वत बाजारव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे..ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटाग्रामीण भागातून वाढत असलेले हे स्थलांतर केवळ शेतीपुरते मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानले जात आहे. शेतीतून उपजीविका अशक्य होत असल्याची भावना अधिक बळावल्यास त्याचे दूरगामी परिणाम ग्रामीण आणि शहरी दोन्ही अर्थव्यवस्थांवर होऊ शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.