Maharashtra Karjmukti Yojana GR 2026: राज्यातील पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' शासनाने जाहीर केली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. कर्जमुक्ती, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी शासनाने निकष निश्चित केले आहेत..सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल.या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही.सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरीत केलेल्या कर्जांनादेखील सदर योजना लागू राहील.या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच अॅग्रीस्टॅक (Agristack) आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. .Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप.कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी प्रक्रियासदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सहकार व पणन विभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. कर्जमाफी योजनेचा आढावा घेणे तसेच योजनेच्या निकषात बदल करणे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची संपूर्ण प्रक्रिया सहकार आयुक्त व प्रबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे..Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?.पुनर्गठन कर्जाचे काय?पीक कर्ज तसेच पुनर्गठन/फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर करण्यात आलेले ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच एकवेळ समझोता योजनेअंतर्गत २ लाखांहून अधिक असलेल्या कर्जाची रकमेची परतफेड करण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत दिली आहे. ही रक्कम परतफेड केल्यानंतरच २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.