Rs 2 lakh Farm Loan Relief Demand: शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ५० हजार रुपयांवर बोळवणूक करु नये. त्यांना २ लाख रुपयांचा लाभ देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. नियमित कर्जदारांच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशारा किसान सभेने राज्य सरकारला दिला आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे..या प्रश्नी किसान सभेच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा केली होती. या चर्चेमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला नियमित कर्जदारांना आणि वंचित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन त्यांनी पूर्ण करावे, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे. .नियमित कर्जदार, ज्यांनी आपले कर्ज काटकसर करुन भरले. ते काही श्रीमंत शेतकरी नाहीत. त्यांनी कर्ज भरले याची शिक्षा त्यांना देता कामा नये. केवळ ५० हजार रुपयांची त्यांची बोळवणूक करणे हे त्यांना शिक्षा दिल्यासारखेच आहे. त्यामुळे त्यांनादेखील २ लाखांपर्यंत दिलासा द्या, ही रास्त मागणी किसान सभेने उचलून धरली आहे..Farm Loan Waiver: दोन ते चार दिवसांत ५ ते १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची माहिती.तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन सरकारने अथवा बँकांनी पुढाकार घेऊन केले आहे; त्यांनासुद्धा २ लाखांपर्यंत न्याय देण्याची आवश्यकता आहे. तसेच जे शेतकरी वेगवेगळ्या अटी- शर्तीमुळे २००९ पासून आतापर्यंत कर्जमाफीपासून वंचित राहिले. त्यांनासुद्धा दिलासा देण्याची गरज असल्याचे नवले यांनी म्हटले आहे..Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना कसले नियम लावता? सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.चंद्रशेखर बावनकुळे, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ३० ऑगस्टच्या आत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी तीनही मंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करुन देत आहोत, असेही त्यांनी नमूद केले..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील २३ लाख ६३ हजार शेतकऱ्यांची केवळ ५० हजार रुपये देऊन बोळवणूक न करता त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देऊन वित्तीय शिस्त मजबूत करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे. तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून पावले टाकावीत, असे आवाहन २३ लाख शेतकरी आणि किसान सभेच्या वतीने आम्ही करत आहोत. यासाठी पुन्हा आंदोलन करणे आणि संघर्ष करणे याची किसान सभेला हौस नाही. ही वेळ शेतकरी आणि किसान सभेवर येता कामा नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि तीनही मंत्र्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत. सकारात्मक प्रतिसाद द्यावा. जनतेचा विश्वास दृढ करावा अशी अपेक्षा असल्याचे नवले म्हणाले. .थकबाकीदारासह नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचा लाभ द्यावा. यावर ३० ऑगस्टपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. अन्यथा राज्यभर आंदोलने केले जातील, असा इशारा किसान सभेच्या वतीने याआधी देण्यात आला होता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.