Farm Loan Waiver Beneficiary Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. ७ ऑगस्ट) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांना ५,०२९ कोटींच्या लाभाचे वितरण करण्यात आले. पण काही कर्जखात्यांच्या बाबतीत त्रुटी असल्याने त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. दुर्दैवाने एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्यास अशा मयत कर्जदारांबाबत प्रकरणांत वारसांची नोंद केल्यानंतर लाभ वितरित करण्यात येणार आहे..एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास, येथील १ हजार ५६४ लाभार्थी शेतकरी मयत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी महसुली दफ्तरी वारस नोंद करून त्याची पूर्तता संबंधित सेवा संस्था व राष्ट्रीयकृत बँकेत करावी, असे शासन स्तरावरुन सांगण्यात आले आहे.शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे..या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत कोणत्याही अडथळ्याविना आणि शक्य तितक्या लवकर पोहोचावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रक्रियेला अधिक गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत..Farm Loan Waiver: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा महत्त्वाचा खुलासा.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज डिजिटल पद्धतीने कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी विजय राठोड ऑनलाइन उपस्थित होते..Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित, ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी जमा, मुख्यमंत्र्यांची माहिती.मयत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ देण्यासाठी प्रयत्न- मंत्री मुश्रीफकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असलेल्या ११,१९८ शेतकऱ्यांची ७४ कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम बँकेकडे आज वर्ग झाली. बँकेचे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. दरम्यान, ॲग्रीस्टॅक नोंदणी न केलेले शेतकरी, मयत खातेदार तसेच वडिलांच्या संमतीने कर्जपुरवठा केलेल्या मुलांच्या रकमेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले..आजच्या ऑनलाईन कर्जमाफी लाभ वितरण कार्यक्रमावेळी ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणारे शेतकरी आणि मयत खातेदारांच्या लाभाबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. तसेच ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही, त्यांनी कुटुंबातील शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांच्या संमतीने पीककर्जाची उचल केली आहे. काही शेतकऱ्यांनी देवस्थानच्या जमिनीवरही पीककर्ज उचल केले आहे. काही शेतकऱ्यांचे वडील मयत झाल्यानंतर अद्यापही सातबारा वारसांच्या नावावर झालेला नाही. अशा शेतकऱ्यांबाबत योग्य तोडगा काढून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही मुश्रीफ म्हणाले. .कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार ९१४ शेतकऱ्यांना लाभकोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार ९१४ लाभार्थ्यांच्या खात्यावर एकूण ८८ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११ हजार १९८ लाभार्थ्यांच्या खात्यावर ७३ कोटी ४१ लाख रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या १ हजार ७१६ लाभार्थ्यांच्या खात्यावर १५ कोटी ५८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत..जिल्ह्यातील ४१ हजार ५५२ पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २४ हजार ४२९ आणि राष्ट्रीयकृत बँकांची १२ हजार १२३ कर्जखाती आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील २६ हजार ९९७ पात्र लाभार्थ्यांची नावे आली होती. त्यापैकी १८ हजार ३७३ लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ८ हजार ६२४ पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७ हजार २५४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांपैकी २ हजार १३ जणांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक नसल्यामुळे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक क्रमांक काढलेला नाही, त्यांनी जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन ॲग्रीस्टॅक क्रमांक काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.