कृषिमंत्री भरणे म्हणाले, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, हा माझा शब्दसमितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईलशेतकऱ्यांना २८ 'जीआर'मधून १९,८०० कोटींची मदत.Farm Loan Waiver: 'या राज्याचा कृषिमंत्री असलो तरी मी पहिल्यांदा एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे दुःख काय, त्यांच्या अडचणी काय? त्यातून काय मार्ग काढला पाहिजे. शेतकऱ्याला काय सहकार्य केले पाहिजे? याची जाणीव मला आहे. त्यासाठी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. हा माझा शब्द आहे,'' असा पुनरुच्चार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी शनिवारी (दि. ६ डिसेंबर) केला. ते 'सकाळ ॲग्रोवन'च्या तिसऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय एफपीसी महापरिषदेत (एफपीसी लीडरशीप कॉन्क्लेव्ह) बोलत होते. .शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी कर्जमाफी केली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी समिती नेमली आहे. समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. कर्जमाफीमध्ये कोणता घटक समाविष्ट करायचा आहे; जेणेकरुन अडचणीत असलेला शेतकरी उभा राहील. समितीने अहवाल दिल्यानंतर ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले..FPC Conclave 2025: राज्यात 'एफपीसी'साठी स्वतंत्र धोरण, यंत्रणा तयार करु- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे .शेतकऱ्यांना २८ 'जीआर'मधून १९,८०० कोटींची मदत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. आमचे सरकार शेतकरी हित जाणणारे आहे. अतिवृष्टीमुळे १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांचे १ कोटी ३ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, त्यांना उभे केले पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका होती. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले. २८ 'जीआर'मधून १९,८०० कोटींची मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले..Farmer Producer Company: ‘एफपीसीं’साठी हवी स्वतंत्र पालक यंत्रणा.मला शेतकऱ्यांप्रति जिव्हाळा आहे. आज माझा शेतकरी अडचणीत आहे. पाऊस अधिक पडतोय. कधी गारपीट होतोय. कधी दुष्काळ पडतोय. हवामानात बदल होतोय. आता आपल्याला याबाबतीत वेगळा विचार करावा लागेल. पाऊस कधी पडतोय ते सांगता येत नाही. कधी ऊन तर कधी थंडी कमी जास्त होते, हे सांगता येत नाही आणि त्याचा शेतीवर, पिकावर परिणाम होतोय. या बदलाला आपल्याला सामोरे जावेच लागेल. या बदलाला सामोरे जाताना या बदलाला धरून पीक पद्धतीत भविष्यात सुधारणा कराव्या लागतील, असे आवाहन त्यांनी केले आहे. नाशिक, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असो, प्रत्येक ठिकाणी शेतीच्या पीक पद्धतीत फरक असल्याचे ते म्हणाले. .Agrowon FPC Conclave: ‘अॅग्रोवन एफपीसी’ महापरिषदेचे शनिवारी पुण्यात आयोजन.शेती परवडते...शेती परवडत नाही, असे म्हणतात. पण स्वतः एक शेतकरी आहे. आमच्या घरातील किराणा मालापासून माझ्या शर्टचा खर्च हा शेतीच्या उत्पन्नात होतो. शेती परवडते नाही, ही शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना आत्मविश्वास द्यायला पाहिजे की शेती परवडते, असे कृषिमंत्र्यांनी सूचित केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.