Maharashtra Shetkari Karjmukti Yojana List: राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १६ लाख ९५ हजार ६६८ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी 'ॲग्रीस्टॅक'वर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. .या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. सदर गावनिहाय याद्या विकास सेवा सोसायटीचे सचिव, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या मदतीने उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. आता शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे. .Farm Loan Waiver: पहिल्या टप्प्यात १७ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, ३१ जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा होणार, गावोगावी याद्या पाठवल्या, मुख्यमंत्र्यांची माहिती.या योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. आधार क्रमांक अथवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावे लागेल. राज्यातील सुमारे ३२ हजार 'आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे..Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेच्या निकषात अंशत: बदल, सुधारित शासन निर्णय जारी.शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण बंधनकारककर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगण्यात आले आहे. त्यासाठी आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक, यादीत तुमच्या नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक घेऊन जावे लागेल. त्यासाठी ग्रामपंचायत अथवा बँकेत जाऊन यादी पाहावी. त्यावर तुमचे नाव आणि युनिक क्रमांक मिळाल्यावर पुढील प्रक्रिया सुरु करता येईल. .याद्या कुठे पाहाल?लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, बँक, आपले सरकार सेवा केंद्रात उपलब्ध केल्या जात आहेत. तेथे शेतकऱ्यांना त्यांचा युनिक क्रमांक तपासून पाहता येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.