Farmer Debt Relief: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ५ जुलैनंतर होईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले होते. पण आता प्रत्यक्षात याचा लाभ मिळण्यास विलंब होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत..कोणत्या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज माफीसाठी पात्र? शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतसंस्था (सोसायट्या) यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज या योजनेत पात्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन धारणेची अट नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पुनर्गठित पीक कर्जालाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. .Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेच्या प्रक्रियेला विलंब;...तोपर्यंत थकित पीक कर्जावर व्याज आकारणी नको, बँकांना निर्देश.कोणत्या कालावधीतील पीक कर्ज माफ होणार?१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले पीक कर्ज जर ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असेल आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत जे भरले नसेल; तर ते माफ होणार आहे. जर कर्ज २ लाखांहून अधिक असेल. तर शेतकऱ्याला २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत भरावी लागणार आहे. त्यानंतरच शासनाकडून २ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची म्हणजेच २ लाखांवरील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत दिली आहे..Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत नाव कसं पाहायचं? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती.या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आपली ‘आधार’ संदर्भातील माहिती बँकेच्या शाखेत देण्याचे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे..कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी विलंब, कृषिमंत्र्यांचे संकेतदरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस काही दिवसांचा विलंब होईल, असे नुकतेच कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जमाफीसाठी आम्ही ५ तारीख दिली आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी होईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम थेट बँकेत जमा होईल, असे त्यांनी म्हटले आहे..शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्याची पडताळणी केली पाहिजे. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, हा सरकारचा हेतू आहे. दोन-चार दिवस उशीर होत आहे, हे आम्ही मान्य करतो. सर्व माहिती घेऊनच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून थोड्याच दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत वर्ग केली जाईल, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.