Restructured Loan Issue: सरकारने २०१७ साली कर्जमाफी दिली. २०१८-१९ साली थकित झालेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. या पुनर्गठनामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जे थकित राहिले नाहीत. ती नियमित झाली. यामुळे ते कर्जमाफीपासून वंचित राहिले. यासाठी सरकारने कर्जमाफीची व्याप्ती वाढवून त्यात या पुनर्गठित कर्जाचा समावेश करावा, अशी मागणी अकोला पूर्वचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये शेतकरी प्रश्नांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. .अकोला जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास असे ३,२०० ते ३,३०० शेतकरी आहेत; ज्यांचे २८ ते ३० कोटी रुपये अडकले आहेत. त्याचा विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. हा सहकार खात्याचा विषय असल्यामुळे काही शासकीय अधिकारी सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करत नाहीत. त्याचा खूप परिणाम भोगावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले..Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल.सीसीआयकडून रेकॉर्ड कापूस खरेदी झाली. २४ मार्चपर्यंत सीसीआयने खरेदी केली. जिल्हा बँकेने सांगितले होते की ३१ मार्चच्या आत कर्ज भरावे लागेल नाही तर तुम्हाला व्याज लागू होईल. यामुळे डिस्ट्रेस सेलिंग झाले. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात कापूस ८ हजारांवरुन १० हजारांवर गेला. सोयाबीन ५ हजारांवरून साडेसात हजारांवर गेले..Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु .आपल्याच सरकारने २०१६ साली आणि नंतर सहकार विभागाने एक परिपत्रक काढले होते. ३१ मार्च ही पीक कर्ज भरण्याची शेवटची तारीख नाही. ती ३० जून किंवा ३६५ दिवस आहे. हे परिपत्रक पद्धतशीररित्या सहकार आयुक्तांच्या कार्यालयात दाबले गेले. हे परिपत्रक पोहोचले असते तर त्याची अंमलबजावणी जिल्हा बँकांनी केली असती. तसेच ३१ मार्चला शेतकऱ्यांना जबरदस्तीने शेतमाल विकण्याची वेळ आली नसती. त्यांना एप्रिल, मे महिना मिळाला असता. पण तसे झाले नाही. दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असल्याचे सावरकर यांनी सांगितले. .'कर्ज भरण्याचा तकादा लावणाऱ्यांवर कारवाई करावी'यामुळे असा निर्णय घेण्यात यावा की ज्या जिल्हा तसेच राष्ट्रीयकृत बँका ३१ मार्चला पीक कर्ज भरण्याचा तकादा लावतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कर्जमाफीची तारीख ३० जून किंवा ३६५ दिवस असली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.