Jalgaon News: जिरायती क्षेत्राबरोबरच बागायती क्षेत्र देखील खंडाने अथवा निम्म्या हिश्शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पण युद्ध, शेतीमालाचे पडलेले दर, महागडी खते व बियाणे, मजूरटंचाई, शेतीबाबत शासनाची अनास्था यामुळे शेती खंडाने घेण्याबाबत अनेक जण अनुत्सुक आहेत. .उत्पादन खर्चापेक्षा लागवड खर्च अधिक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बेमोसमी पाऊस, गारपीट, कमी पर्जन्यमान, अति पाऊस या नैसर्गिक संकटासोबतच मानवनिर्मित संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेती तोट्यात आहे. कापूस, केळी, कलिंगड, कांदा, पपई पिकाला उठाव नाही..Land Record Fraud: सातबारा, फेरफार नोंदीत बेकायदा बदल .दर नाहीत. हरभरा, मका, गहू घेण्यास खरेदीदार तयार नाहीत. दुसरीकडे शेती मशागत खर्च, मजूरटंचाई, खते, बियाणे यातील समस्या वाढत आहेत. पुढे दुष्काळ पडेल, असेही सांगितले जात आहे. यामुळे यंदा शेती खंडाने करण्यास अनेक जण तयार नाहीत..जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर या भागात शेती खंडाने उपलब्धतेचे प्रमाण अधिक आहे. रावेर, यावल भागांत हे प्रमाण कमी आहे. जळगाव, धरणगाव, चोपडा भागात एकरी ११ ते १२ हजार रुपये असे दर बागायती शेतीसंबंधी वर्षभरासाठी ठरले आहेत. यात शेतीमालकास आपली शेती पेरणीसाठी तयार करून द्यायची आहे..Land Preparation: शेतांची पूर्वमशागत सुरू.गुढीपाडव्याला अनेकांनी साधला मुहूर्तग्रामीण भागात मजुरांची संख्या भेडसावत आहे. शेतकरी आपली शेती खंडाने देण्याकडे पुढे सरसावले आहेत. शेतकऱ्यांचे नववर्ष हे गुढीपाडव्याला असते. याच दिवशी सालगडी ठेवणे, शेती वाट्याने देणे असे शेतीचे वार्षिक नियोजन अनेकांनी केले..गेल्या काही वर्षांपासून बी-बियाणे, रासायनिक खते यांचे वाढते दर, मजूर टंचाई, रोजगाराची वाढती स्पर्धा, लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, सालगड्यांची वाढलेली मजुरी, निसर्गावर आधारित शेती, विविध नैसर्गिक संकटे आदी अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात शेती सापडली आहे. मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरीदर ठरवीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.