kolhapur News: कष्टकरी शेतमजूर हाच ग्रामीण भागाचा महत्त्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. .तेरवाड (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. घाटगे बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर होते..Farm Labour Shortage : शेतकरी-मजुरांमध्ये खानदेशात ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्यूला.श्री घाटगे म्हणाले, की घरातील चांगल्या संस्कारातूनच संस्कारक्षम पिढी घडवू शकते. त्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. जीवनामध्ये पैसा हे जीवन जगण्याचे साधन असून ते अंतिम साध्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी व समाधानी जीवन जगले पाहिजे..Labour Reforms: कामगारांसाठी महत्वाची बातमी; महाराष्ट्रात कामाचे तास वाढले, नव्या सुधारणांना मंजुरी.पश्चिम महाराष्ट्र राज्य शेतमजूर व कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासणे म्हणाले,संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे पेन्शन १५०० रुपये वरून २५०० रुपये करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले आहे..पेन्शन वाढीच्या या महत्त्वाच्या लढ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गुरुदत्त शुगरचे चेअरमन श्री घाटगे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, गुरुदत्त शुगर्स चे संचालक शिवाजीराव माने - देशमुख शिवाजी सांगले, विश्वास बालिघाटे, पॅंथर आर्मीचे संस्थापक संतोष आठवले, शोभाताई पाणदारे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.