Bee Sting Fatality : चंद्रपूर शेतात तण नियंत्रणाचे काम करीत असताना मधमाशांच्या थव्याने पती-पत्नीवर हल्ला केला. यात महिपाल कचरू येरमा (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नी शालू महिपाल येरमा (वय ५०) जखमी झाल्या. ही घटना व्याहाड खुर्द येथील शेतात घडली..महिपाल येरमा व शालू येरमा हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. महिपाल यांनी व्याहाड खुर्द येथील मनोहर डोंगरे यांची शेती ठेक्याने घेतली होती. खरीप हंगामातील रोवणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतातील वाढलेले तण काढण्यासाठी दोघेही सकाळी नऊच्या सुमारास शेतात गेले होते. निंदण काढण्याचे काम सुरू असतानाच शेजारील झाडावरील पोळ्यातील मधमाशांच्या थव्याने अचानक दोघांवर हल्ला केला..Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार.मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पती-पत्नीने पळ काढला. जवळच असलेल्या कालव्यात जाऊन पाण्यात डोके बुडवून मधमाशांपासून सुटका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात महिपाल येरमा यांची प्रकृती गंभीर झाली आणि ते बेशुद्ध पडले. पत्नी शालू यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून जवळील राजोली चक येथील एका नागरिकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मोबाईलद्वारे येरमा यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली..Women Farmer Empowerment: शेतीत राबणाऱ्या शक्तीला मिळणार स्वतंत्र ओळख.मुलांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. महिपाल यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री सुमारे नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. शालू येरमा यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे..शेतीतील कामे करीत असताना मधमाशांच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याने व्याहाड खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महिपाल येरमा यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार हरपल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.