Khandesh Agriculture Challenges: खानदेशात यंदा मका लागवडीचे क्षेत्र स्थिर असले, तरी अमेरिकन लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ३० ते ३५ दिवसांच्या मका पिकात दोन ते तीन वेळा कीडनाशकांची फवारणी करूनही अळीवर प्रभावी नियंत्रण मिळत नसल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे..खानदेशात यंदा सुमारे १.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. गत रब्बी हंगामात हे क्षेत्र सुमारे १.२२ लाख हेक्टर होते. कापूस पिकाची घटलेली आर्थिक व्यवहार्यता आणि परतीच्या पावसाचा तुलनेने कमी परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांचा कल मका लागवडीकडे वाढला आहे..Maize Farming: पेरण्या लांबूनही शेतकऱ्यांची मक्यालाच पसंती.मात्र लागवडीनंतर अवघ्या २० ते २२ दिवसांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कीडनाशकांची फवारणी करावी लागत आहे. एका फवारणीसाठी प्रति एकर सुमारे २ हजार रुपयांचा खर्च होत असून, सव्वा महिन्याच्या पिकात दोन ते तीन फवारण्या करूनही अळीचे नियंत्रण होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे..Maize Cultivation: खानदेशात मका क्षेत्र पोहोचले एक लाख २० हजार हेक्टरवर.जळगाव जिल्ह्यातील ३२ ते ३५ हजार हेक्टर क्षेत्रात प्रादुर्भाव अधिक तीव्र असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रांनी व्यापक पीक पाहणी व मार्गदर्शन मोहीम राबविण्यासह स्वस्त दरात कीडनाशके आणि अनुदानित निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत..पोंग्यात अळीचे वास्तव्यअमेरिकन लष्करी अळी मका पिकाच्या पोंग्यात राहून कोवळी पाने कुरतडते. त्यामुळे पाने छिद्रयुक्त दिसतात, पिकाची वाढ खुंटते आणि झाडे पिवळी पडू लागतात. अनेक शेतकरी खत व सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करत असले तरी अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.