Seed Scam: नाशिक जिल्ह्यात बोगस कांदा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. कणकापूरमधील शेतकऱ्यांनी २२ किलो बियाण्यांवर ३९ हजार ६०० रुपये खर्च केले, परंतु उगवण केवळ १० ते २० टक्क्यांपर्यंतच झाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.