Mango Fraud: जीआय मानांकन मिळालेला व जगभर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचा हंगामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. तरीही स्थानिक बाजारात कर्नाटकातून आलेल्या आंब्यांची हापूस म्हणून विक्री सुरू झाल्याने बागायतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. .ग्राहकांची दिशाभूल करून चढ्या दराने आंब्यांची विक्री होत असल्याचा आरोप करत कोकणातील आंबा उत्पादकांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला असून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे..Mango Harvesting: आंबा फळांची काढणी करताना....कोकणातील विशेषतः रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरातील हापूस आंब्याची आवक अद्याप सुरू झालेली नाही. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात तुरळक प्रमाणात कोकणातून हापूस येऊलागला आहे. पुरवठा कमी आणिमागणी जास्त असल्याने हापुसला मोठा भाव आहे..याच संधीचा फायदा उचलण्यासाठी काही विक्रेते कर्नाटकातून आंबा आणून येथील स्थानिक बाजारात हापुस आंब्याच्या नावाखाली विक्री करू लागले आहेत. अलिबाग, मुरुड येथील रस्त्याच्याकडेला काही विक्रेते आंबे विकताना दिसत आहेत..Mango Farmers: आंबा उत्पादकांसाठी तुटपुंजी मदत.कोकणच्या ‘राजा’ची वैशिष्ट्येहापूस कापल्यावर केशरी दिसतो. पिवळेपणाची झाक त्यावर नसते.कर्नाटकातील आंब्यांचा सुगंध हापूस इतका गोड येत नाही.हापूस आंबा तयार झाल्यावर त्याच्यावर सुरकुत्या पडतात.कर्नाटक आंबा तयार झाल्यावर कडकच असतो.कर्नाटकी आंब्याची सालही जाड असते.हापूस आंब्याची साल पातळ असते..कोकणच्या हापूस आंब्याला जी आय मानांकन मिळाल्यानंतर मागणीत प्रचंड वाढ झालेली आहे. मागणी वाढत असल्याने देश भारत पुरवठा करणाऱ्या वाहतूकदरांची एक साखळी निर्माण होत असून यात आधीपासून बस्तान मांडून बसलेले कर्नाटकातील वाहतूकदार, व्यापाऱ्यांनी प्रवेश केला आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या नावाने देशातील इतर भागातही हे व्यापारी विक्री करतात. यावरही ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.- डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.