Nashik News: नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी संबंधित ग्रामसेवकांना बनावट नियुक्ती आदेश दिल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी चौकशीचे आदेश देत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे..प्राथमिक चौकशीत अक्षय सूर्यकांत चौधरी या व्यक्तीने बनावट नियुक्ती आदेश तयार करून शासन व जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले. त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. यामागे इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी केली जात आहे..Gramsevak Protest : ग्रामसेवकांचा सोमवारपासून असहकार आंदोलनाचा इशारा.या प्रकरणी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक पंचायत समितीच्या नावाने ग्रामसेवकाचा बनावट नियुक्ती आदेश तयार करण्यात आला. जिल्हा परिषद जिल्हा निवड समिती, ग्रामपंचायत विभाग यांच्या नावाने “जावक क्रमांक : जिपसां/ग्रापं/आस्था ४/प्रा. सेवक/२०२६” असा बनावट नियुक्ती आदेश तयार करून संबंधित व्यक्तीस ग्रामसेवक पदावर हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. हा आदेश घेऊन संबंधित व्यक्ती २७ फेब्रुवारी २०२६ ला पंचायत समितीत पोहोचली. मात्र, अशा स्वरूपाचा कुठलाही नियुक्ती आदेश दिलेला नसताना हा आदेश प्राप्त झाला कसा, याविषयी शंका उपस्थित करण्यात आली..Gramsevak Recruitment : ग्रामसेवकांच्या भरतीने गावगाडा सुरळीत.अधिकाऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायत विभागाच्या निदर्शनास आणली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत..जिल्हा परिषद प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचनाशासनातर्फे नियुक्त होणाऱ्या सर्व अधिकृत संकेतस्थळ, जाहिरात व पडताळणी या माध्यमातूनच केली जाते. संशयास्पद कागदपत्रे किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ संबंधित पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालय किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व विभागांना अधिक सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. पडताळणी प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात येणार आहे.शासनाच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.