Fake Fertilizer: अहिल्यानगर: वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने बनावट खत तयार करून विक्रीसाठी आणलेला सव्वा सहा लाख रुपयांचा २४ टन बनावट रासायनिक खताचा ट्रक कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे पकडला. कृषी विभाग व पोलिसांनी ही कारवाई केली असून खत नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. खत वाहतूक करणारा ट्रक चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे..अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून बनावट खत विक्री होत असल्याच्या तक्रारी सुरू होत्या. एक ट्रक कोपरगाव येथे बनावट खत घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर दिवशी विभागाच्या विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत संबंधित खत वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता संबंधित खताबाबत कुठलेही कागदपत्रे अथवा पावत्या नव्हत्या. ट्रकमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे 487 गोण्या (24 टन खत) आढळून आले. या खताची किंमत साधारण सव्वा सहा लाख रुपये आहे. त्यामुळे पोलिस आणि कृषी विभागाच्या पथकाने संबंधित खत जप्त केले असून ट्रकचालक भुजंग नामदेव केदार रा. वारणी (ता. शिरूर कासार, जि. बीड) यास ताब्यात घेतले आहे. तालुका गुण नियंत्रक गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिसात याप्रकरणी खत नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून याबाबत वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे ही खते असल्याने आणखी गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. .Fake fertilizers: खतांचा काळाबाजार, बोगस खत विक्री रोखण्यासाठी योगी सरकारचा मोठा निर्णय.हे खत कुठे तयार करण्यात आले?, कुठून वाहतूक करण्यात आली? याबाबत तपासणीत उघड होईल, असे जिल्हा गुण नियंत्रक राहुल ढगे यांनी सांगितले. तपासणीनंतर बनावट खत विक्री करणारे मोठे रॉकेट उघड होण्याची शक्यता आहे..Fake Fertilizer : खतामध्ये आढळले चक्क प्लॅस्टिकचे दाणे .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.