Yavatmal Fake Fertilizers Scam Exposed: खताच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करून चक्क मातीची विक्री केली जात असल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कृषी आयुक्तालय, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय आणि जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने भोयर एमआयडीसी परिसरात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत तब्बल २,१५१ बॅग (१०७.५५ टन) अनधिकृत खतसाठा जप्त केला..या साठ्याची किंमत २४ लाख ७३ हजार ४५० रुपये असून, या प्रकरणी खत उत्पादकांसह तिघांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (ता. १२) रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान भोयर एमआयडीसी येथील प्लॉट क्रमांक ५३/१ परिसरात छापा टाकण्यात आला..Fertilizer Shortage: युरिया, ‘डीएपी’चा कृत्रिम तुटवडा.तपासादरम्यान ‘मे. ओम ॲग्रो ऑर्गनिक्स या कंपनीकडे ‘ए-७६’ या ठिकाणाचा परवाना असताना प्रत्यक्ष उत्पादन आणि साठवणूक मात्र दुसऱ्याच ठिकाणी सुरू असल्याचे आढळले. वैध परवानगी नसताना खत निर्मिती आणि साठवणूक केली जात असल्याचेही समोर आले..कारवाईदरम्यान घटनास्थळावरून विविध प्रकारचा अनधिकृत खतसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याचे एकूण वजन १०७.५५ टन असून त्याची किंमत २४.७३ लाख रुपये आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील खत व्यवसाय आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..Fertilizer Scam: जादा दराने खते, बियाणे विकणारी दुकाने तपासा.दरम्यान, कारवाईत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित उत्पादकांकडून खताच्या नावाखाली प्रत्यक्षात मातीची विक्री केली जात असल्याचा प्राथमिक संशय आहे. विशेष म्हणजे, या उत्पादनांचा पुरवठा एमआयडीसी परिसरातही करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या संपूर्ण प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे..या प्रकरणी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी संजय अनंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन सुरेश तोटे (प्रोप्रायटर, मे. ओम ॲग्रो ऑरगॅनिक्स), अविनाश वसंतराव दुधे आणि जसवंत सिंग गिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..ही धडक कारवाई कृषी आयुक्तालयाचे डॉ. आर. डी. धायगुडे, शाहूराव मोरे, अमरावती विभागाचे नितीन लोखंडे, संजय पाटील तसेच यवतमाळचे प्रवीण जाधव आणि धिरज मोहेकर यांच्या संयुक्त पथकाने केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.