Ahilyanagar News: शेतकऱ्यांना बनावट खत विक्री करण्याचे कोपरगाव तालुक्यात महिनाभरात पाच प्रकार उघड झाले आहेत. कृषी विभागाने चार वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करत सुमारे वीस लाखांचे ८२ टन खत जप्त केले आहे. त्यामुळे बोगस खताची विक्री करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. .शेतकऱ्यांना बनावट खताची विक्री करून फसवणूक होत असल्याच्या कोपरगाव तालुक्यात तक्रारी येत होत्या. त्याबाबत कृषी विभागाने दक्ष होऊन कारवाई सुरु केली. महिनाभरात तीन ठिकाणी बनावट खत विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्याने कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असल्याचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी सांगितले..Fake Fertilizer: कोपरगावात २४ टन बनावट खत पकडले.कोपरगाव तालुक्यासह जिल्हाभरातच बनावट खत, विद्राव्य खताचा सुळसुळाट आहे. त्यातच कृषी विभागाने कोपरगाव तालुक्यात महिनाभरात पाच कारवाया केल्या आहेत. .Fake Fertilizer : खतामध्ये आढळले चक्क प्लॅस्टिकचे दाणे .तालुक्यात दोन वेळा दोर्डे कोऱ्हाळे शिवारात दोन कारवाया झाल्या आहेत. रासायनिक खताचा साठा करून ठेवला होता. त्याबाबत माहिती मिळाल्या नंतर कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. वेगवेगळ्या कंपनीचे खत असल्याचे दिसून आले..सदर खत बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने तीन वेगवेगळ्या खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसह देर्डे कोऱ्हाळे येथील खत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असून पाऊण लाख किमतीचे ३.८७ टन बनवाट खत जप्त केले. त्यानंतर पाठोपाठ चार कारवायांत बनावट खतविक्रीचे प्रकार उघडकीस आले. शुक्रवारी (ता. २७) तळेगाव मळे गावांत साठा करून ठेवलेले २ लाख १५ हजार रुपये किमतीचे १२.१५ टन खत जप्त करून विविध चार खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.