Agriculture Relief: मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या पूर्वमोसमी पावसाने १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि प्रस्ताव आल्यानंतर मदत द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ७) या बैठकीत दिले. .जानेवारीपासून झालेल्या पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली. दरम्यान, राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान, झालेल्या पूर्वमोसमी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली..Mango Crop Compensation: आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी.ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या पूर्वमोसमी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अधिक नुकसान झाले होते..मार्चअखेर आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे २९ जिल्ह्यांमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारीसह आंबा, काजू, संत्र्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे..Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही.जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे एकूण १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. .यात प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलडाणा आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या पावसामुळे पाच लोकांचा मृत्यू आणि नऊ लोक जखमी झाले. तसेच, ३६ पशुधनांचाही मृत्यू झाला आहे. ज्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, त्यांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले..२. ९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढणारदरम्यान, जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा त्यामुळे उपलब्ध झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे..३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होणारजुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित, तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.