Sugarcane Production News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांसह जळगाव व नंदुरबार मिळून पाच जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी आत्तापर्यंत ऊस गाळतात सहभाग घेतला आहे. आणखी एक कारखाना सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असून आता कुठे कारखान्यांनी क्षमतेने गाळपात गती पकडली आहे. .साखरे विभागाच्या माहितीनुसार, की छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील जवळपास सर्व कारखाने आत्ताच्या घडीला पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करीत असल्याचे दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एका कारखान्याने आत्तापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० टन उसाचे गाळप करत १ लाख ९५ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कारखान्याचा साखर उतारा सरासरी ५.८९ टक्के इतका राहिला..Sugarcane Crushing: खानदेशातील कारखान्यांचे पाच लाख टन उसाचे गाळप.जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने ७७ हजार ९४० टन उसाचे गाळप करत सुमारे ६३ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्याचा साखर उतारा सरासरी ८.१९ टक्के इतका राहिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन सहकारी व पाच खासगी मिळून आठ कारखान्यांनी आतापर्यंत ऊस गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी १२ लाख १३ हजार ७५१ टन उसाचे गाळप केले. .Sugarcane Crushing: नांदेड विभागात गाळप हंगामाला गती .या आठही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.५९ टक्के राहिला. देवगिरी कारखाना जानेवारीत सुरू होण्याची शक्यता असून बीड मधील वैद्यनाथचे गाळपही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून पाच कारखान्यांनी आतापर्यंत गाळपात सहभाग घेतला. .या कारखान्यांनी १० लाख ३४ हजार १८८ टन उसाचे गाळप केले. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ७.२३ टक्के राहिला. बीड जिल्ह्यातील सहा सहकारी व दोन खासगी मिळून आठ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी सुमारे १६ लाख ७६ हजार ३५८ टन उसाचे गाळप केले. या कारखान्यांचा सरासरी गाळप उतारा ६.५९ टक्के राहिल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली..मशीनने क्रशिंगचा वापर वाढलासाखर विभागाच्या सूत्रानुसार, राज्यात सुमारे एक हजारावर हार्वेस्टरच्या साह्याने उसाची काढणी आजमितीला सुरू आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सुमारे ७० पेक्षा जास्त ऊस हार्वेस्टर कार्यरत आहेत. एकीकडे थंडीचा जोर वाढत असल्याने मजुरांच्या हाताला गती मिळणे अडचणीचे आहे. असे असले तरी आतापर्यंत ऊसतोड मजुरांची पळवा पळवी पुढे आली नसल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.