Latur News: ‘‘मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना किमान साडेतीन हजार प्रतिटन उसाला भाव दिला पाहिजे. एवढा भाव देत नसतील तर ऊस गाळपाला देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे,’’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (ता. २४) पानगाव (ता. रेणापूर) येथे आयोजित ऊस परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व ऊसतज्ज्ञ पांडुरंग आव्हाड यांची प्रमुख उपस्थित होती. श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘साखर कारखानदार शेतकऱ्यांना काटेमारी व रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून लुटत आहेत. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली जात नाही..Sugarcane Rate: ‘माळेगाव’चा अंतिम दर ३४५० रुपये .तोडणी वाहतूकदार पैशाची मागणी करत आहेत. या सर्व फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांनी एकजूट होऊन लढले पाहिजे.’’ श्री. धोत्रे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे एकजूट करून एफआरपी पदरात पाडून घेतली पाहिजे, असे सांगितले..श्री. आव्हाड यांनी एक एकरमध्ये शंभर टन ऊस उत्पादनाचा कानमंत्र शेतकऱ्यांना दिला. परिषदेचे आयोजक मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी पन्नगेश्वर कारखान्याने शेतकऱ्यांचे भाग व अन्य देणी न दिल्यास कारखाना चालू न देण्याचा इशारा दिला..Raju Shetti: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत फसवी : राजू शेट्टी.वीज पडून म्हैस मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यास या वेळी अकरा हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश श्री. धोत्रे यांच्या वतीने देण्यात आला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचेही वाटप करण्यात आले..परिषदेला मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण चव्हाण, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कदम, जिल्हा सचिव संतोष दाणे, रेणापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.