पीएम किसानच्या हप्त्याबाबत एक पोस्ट व्हायरल होत आहे किसान कॉल सेंटरला कॉल केल्यास पीएम किसानचे पैसे दोन मिनिटांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचा दावापण हा दावा पूर्णपणे खोटा निघाला .PM Kisan 21th Installment : केंद्र सरकारने नुकताच पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील २७ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा हप्ता जमा केला. २१ व्या हप्त्याची ही रक्कम शेतकऱ्यांना आगाऊ स्वरुपात देण्यात आली. आता देशातील उर्वरित ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे..काय आहे व्हायरल दावा?याचदरम्यान, इंटरनेट आणि सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की किसान कॉल सेंटरला (KCC) कॉल केल्यास पीएम किसान सन्मान निधीचे २ हजार रुपये दोन मिनिटांत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. या व्हायरल पोस्टवरुन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने मोठा खुलासा करत शेतकऱ्यांना सतर्क केले आहे..PM Kisan Yojana : तीन राज्यांतील शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसानचा २१ वा हप्ता; उर्वरित राज्यांत कधी येणार पैसे; महत्त्वाची अपडेट.Fact Check : खरं काय?ही चुकीची माहिती व्हायरल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. किसान कॉल सेंटरकडून पैसे हस्तांतरित केले जात नाहीत. किसान कॉल सेंटरचे काम केवळ शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित माहिती देणे आहे. अधिकृत माहितीसाठी नेहमीच कृषी कल्याण मंत्रालय आणि पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) आणि १८००-१८०-१५५१ या क्रमांकाचा वापरा करावा. .PM Kisan Yojana : जमिनीचा हक्क नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ, लवकरच मिळणार हप्ता.शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचनाअशा खोट्या व्हायरल दाव्यापासून शेतकऱ्यांनी सतर्क राहायला हवे. तसेच खोट्या अथवा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. किसान कॉल सेंटरचा क्रमांक हा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहे. ते पैसे पाठवत नाहीत. यामुळे, अफवांना बळी पडू नका आणि गरज पडल्यास केवळ अधिकृत क्रमांक अथवा चॅनेलला वापर करा, असे आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.