Teacher Identity: शिकविणारे शिक्षक म्हणून शिक्षकांना ओळखले जाते. पण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण-२०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण-२०२४ मध्ये शिक्षकांना सुलभक आणि सुनियोजनकार म्हणून एक लक्षणीय आणि प्रभावी भूमिका बजाविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जात आहे. आता नव्याने विद्यार्थी स्वतःहून शिकत असताना विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ज्ञानाचे वहन सोपे करून सांगणारे म्हणजे सुलभक आणि शालेय स्तरावर अध्यापनाबरोबर उपक्रमांचे नियोजन करून त्यांचे कालबद्ध आयोजन करणारे शिक्षक असावेत, अशी अपेक्षा आहे..शिक्षकांनी आता स्वतः स्वतःचे सर्वार्थिक सक्षमीकरण आणि सबलीकरण करून शालेय संस्कृतीचा एक महत्त्वाचे घटक म्हणून प्रत्यक्ष शाळेवर आणि आनुषंगिक क्षेत्रांवर राबणे आणि विद्यार्थ्यांनाही राबवणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या उत्तम ज्ञानामुळे आणि माहितीमुळे शिक्षकांचे ‘आदर्श गुरुजी’ म्हणून सामाजिक स्थान अधिक बळकट आणि शाश्वत होते. शिक्षकांमध्ये जर संकल्प आणि संकल्पना पक्क्या असतील तर त्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या मुरतात..Innovation in Education: अज्ञानाच्या अंधारातील चाचपड.ज्ञान आणि माहिती झऱ्याप्रमाणे झिरपत-झिरपत आणि कालसुसंगत न्यावी लागते. बोधात्मक क्षेत्रामध्ये - शिक्षकांच्या विषयज्ञान क्षमता, अध्यापनावर प्रभुत्त्व, मूल्यांकनाचे ज्ञान, मानसशास्त्र ज्ञान, व्यासंग आणि नियोजनक्षमता या गुणवैशिष्ट्यांचा समावेश होतो. तर भावात्मक क्षेत्रामध्ये - सहानुभूती, उत्साह, श्रमनिष्ठा, समाजाभिमुखता, मार्गदर्शक आणि व्यावसायिक दृष्टिकोन या गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव होतो. क्रियात्मक क्षेत्रामध्ये - न्यायप्रियता, प्रयोगशीलता, वर्गनियंत्रक, नियोजक, नेतृत्व आणि उपक्रमशीलता या गुणवैशिष्ट्यांना महत्त्वाचे मानले गेले आहे. म्हणून वरील तीन क्षेत्रांचा विचार करता, शिक्षणातून आणि संस्कारांतून गुरुजींना विद्यार्थ्यांमधून आदर्श आणि चारित्र्यसंपन्न माणूस निर्माण करणे, विद्यार्थ्यांना स्वतः जाणून घेण्याची गोडी निर्माण करणे, त्यांचे कुतूहल आणि विवेक जागृत करणे, त्यांना संस्कारक्षम आणि सुसंस्कृत माणूस बनविण्याचे कार्य करणे यासाठी शिक्षकांना स्वतःच्या काळजात डोकावून काम करावे लागणार आहे..शिक्षकांचे स्वविकसनशिक्षकांनी आता पूर्वीप्रमाणेच स्वतः स्वतःचे न्यायाधीश होऊन आत्मपरीक्षण करणे आणि स्वतःचे वर्तन, राहणीमान, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता, नैतिकता इत्यादी मूल्यात्मक गोष्टींचा खोलवर विचार करून अधिकाधिक शिस्तप्रिय होणे अगत्याचे आहे. शिक्षकांच्या अशा व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये दिसते. शिक्षकांच्या आचरणाने विद्यार्थ्यांचे आचरण कृतिशील होते. कार्यातून होणारा परिणाम आणि प्रभाव दीर्घकाल टिकतो. यालाच शिक्षकांचे ‘स्व’ विकसन आणि सक्षमीकरण म्हणतात. आणि या जाणिवेतूनच विद्यार्थ्यांचे असेच ‘स्व’ विकसन आणि सक्षमीकरण होत असते..शिक्षकांना अनुभवातून शिक्षणाबरोबरच चालू घडामोडींचे अद्ययावत ज्ञान स्वतः असावे लागते, त्या वेळी ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव देऊ शकतात. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ती प्रथम सोडविण्याची भावना शिक्षकाकडे असावी. उदाहरण म्हणून सांगायचे झाल्यास, आर्थिक चणचणीपोटी अनेकदा विद्यार्थी शाळा सोडून शेतीमध्ये काम करतात..Education For All: समाजमंदिरे बनली ज्ञानमंदिरे.अशावेळी एकीकडे शाळा महत्त्वाची वाटते आणि दुसरीकडे घरच्या माणसांना शेतातील कामे महत्त्वाची वाटतात. अशावेळी विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. अभ्यासामध्ये विद्यार्थी मागे पडतात. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम समजून घ्यावे आणि सांगावे, की शाळा भरण्याच्यापूर्वी किंवा दिवसभर शाळा केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरच्या शेतात घरच्यांना राबण्यासाठी मदत करा. सुट्टीच्या दिवशी थोडाफार अभ्यास करा आणि नंतर दिवसभर शेतात राबा. हे ही गावपातळीवरील एक नियोजन आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये टिकतात..निपुण भारत उपक्रमाच्या अंतर्गत आता शिक्षक खूप मेहनत घेत आहेत. शिक्षकांनी अध्यापन केल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या अध्ययनक्षमतेनुसार विद्यार्थी शिक्षकाने दिलेले ज्ञान, माहिती आणि अनुभव ग्रहण करतात. त्यामुळे काही विद्यार्थी कुशाग्र बुद्धिमत्तेचे होतात आणि काही मध्यम बुद्धिमत्तेचे होतात आणि काही किमान बुद्धिमत्तेचे होतात.आजच्या अति आधुनिक आणि गतिमान काळात जगाच्या शैक्षणिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना स्थानिक आणि जागतिक स्तरावर असलेले शिक्षण द्यावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रधान गुणविशेष, केंद्रीय गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष यांचा समावेश असणे खूपच गुणात्मक ठरणारे आहे..दयाळूपणा, क्षमाशीलता, बुद्धी प्रामाण्यवाद अशा एखाद्या तरी गुण विशेषाने शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते आणि शिक्षकाबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे असेच व्यक्तिमत्त्व साकारावे. केंद्रीय गुणविशेष हा सर्वसामान्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा मूलभूत पाया आहे. प्रामाणिकपणा, समाजाभिमुखता, वक्तशीरपणा, जबाबदारपणा या गुणांनी नटलेले शिक्षक आणि विद्यार्थी समाजाची आणि स्वतःची प्रगती करतात. दुय्यम गुणविशेष हे काही कोणाच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत नाहीत. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण अधिक प्रमाणात असतात. या गुणविशेषांचा म्हणजेच, शिक्षकाची अभिवृत्ती, प्राधान्यक्रम आणि आवडीनिवडीचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर घडत असतो. त्यानुसार विद्यार्थ्यांची अभिवृत्ती, अभिरुची आणि जीवन आकलनक्षमता वाढीस लागते..शिक्षकांना स्वतःचे मत, प्रत्यक्ष संपर्क, चांगला वक्ता आणि चांगला श्रोता, चांगला संपर्कशील माणूस, स्वत: प्रति कठोर, इतरांसाठी मित्र आणि स्वतःचा संयम बाळगत स्वयंप्रेरणेने व स्वयंशिस्तीने स्वतःचे शिक्षक म्हणून नेतृत्व सिद्ध करताना शिक्षकाला कसदार गुणांची स्वतः साठी बांधणी करावी लागते. मानवी दृष्टिकोन ठेवून मानवी कल्याणाच्या विचारांबरोबर पर्यावरण आणि साहाय्यभूत परिसंस्था यांचा संवेदनशील विचार करणे शिक्षकाला जमले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात सामाजिकहित आणि लोककल्याणाचा सहेतुक, साकल्याने आणि जाणिवेने विचार करून कार्यवाही करणे हे शिक्षकाच्या सेवेचे सुव्यवस्थापन आहे..यामुळे शिक्षक स्वतःच्या गुणांची पारख करून आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बनतात. स्वतःमधील आणि विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा विकास साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहतात. संदर्भक्षमता, संबोधक्षमता, आशयज्ञानक्षमता, शैक्षणिक व्यवहारक्षमता, शैक्षणिक उपक्रमक्षमता, शैक्षणिक साहित्य- निर्मिती व वापर क्षमता, मूल्यांकनक्षमता, व्यवस्थापनक्षमता, पालक संपर्कक्षमता, समाज संपर्कक्षमता या दहा क्षमतांसाठी संपूर्ण योगदान देऊन स्वतःचा, शाळेचा, विद्यार्थ्यांचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी शिक्षक कार्यरत राहतात.७७७५८४१४२४(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.