Pune News: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नवीन दर प्रस्तावित करण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाला सहा महिने मुदतवाढ दिली आहे..राज्यातील जलसंपत्तीचे विनियमन करण्यासाठी तसेच जलसंपत्तीचे समन्यायी व्यवस्थापन, वाटप आणि वापर सुकर करण्यासाठी, तसेच पाण्याचे दर निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. तर या प्राधिकरणाचे अधिनियमामध्ये दर निश्चितीचे अधिकार देण्यात आले आहेत..Water Shortage : राज्यात पाणी टंचाईचे चटके; छ. संभाजी नगरमधील धरणांचा पाणीसाठा २० टक्क्यांवर, टँकरही वाढले.नियमानुसार सिंचनाचे व्यवस्थापन करण्यासाठी येणारा प्रशासकीय खर्च पाणी पट्टीतून वसूल होईल, हे विचारात घेऊन पाण्याचे दर ठरविण्यात यावेत, असे म्हटले आहे. तसेच प्रत्येक तीन वर्षांनी पाणीपट्टीचे पुनर्विलोकन करण्याचे अधिकार जलसंपदा विभागाला दिले आहेत..Water Supply: टँकरची समस्या खानदेशात दूर.या वर्षी राज्यात एक जुलै २०२५ पासून नवे दर अपेक्षित होते. मात्र जुलै २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीचे ठोक पाणीवापराचे दर जलसंपदा विभागाकडून अजून अंतिम झाले नसल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मागील वर्षीचे जलदर डिसेंबर २०२५ पर्यंत ठेवण्याचे आदेश जारी केले होते..या काळात पाण्याचे नवे दर प्रस्तावित करणे अपेक्षित होते. प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली. यामुळे पाणी दर निश्चिती लांबणीवर टाकली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.