Indian Mango Export : अतिघन आंबा लागवडीबरोबरच गट शेतीतूनच केसर आंबा निर्यात शक्य असल्याचे मत फळबाग व आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले..बीड जिल्ह्यातील जिवाचीवाडी (ता. केज) येथील सत्यनारायण बळीराम चौरे यांच्या अतिघन लागवड आंबा बागेत अतिघन केसर लागवड या तंत्रज्ञानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. कापसे म्हणाले, ‘‘आपण आपल्या खोऱ्याच्या डोंगराळ प्रदेशात अति आधुनिक अशा अतिघन लागवड पद्धतीने आंब्याच्या बागा फुलवल्या. त्यामुळे या बागातून मोठ्या प्रमाणात निर्यात शक्य आहे..Mango Export: निर्यातीला संधी, पण गुणवत्ता महत्त्वाची.’’ डॉ. कापसे यांनी मध्येच जे. बी. एक्स्पोर्टचे चेअरमन प्रकाशभाई खखर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या भागातील आंबा निर्यात कशाप्रकारे करता येईल याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर आपण या भागात येऊन ४५ ते ५० एकर आंबा बागेची मार्चमध्ये स्वतः पाहणी करावी. येथून यंदा २५० टन तरी आंबा तयार होईल. प्रायोगिक तत्त्वावर निर्यात सुरू करावी, अशी सूचना केली, त्यावर प्रकाशभाई यांनी सकारात्मकता दाखवली..Mango Export: निर्यातवृद्धीचा ‘मार्ग’.अगदी भारी जमिनीपेक्षाही माळरान व मुरमाड जमिनीत अति उत्कृष्ट आंबा येऊ शकतो. कारण अशा जमिनीमधून १५ दिवस लवकर तसेच भरपूर मोहर येऊन अति उत्कृष्ट प्रतीचा आंबा कसा तयार होऊ शकतो, हे शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगितले. तीन बागांत शिवार फेरी करून प्रत्यक्ष मोहर संरक्षण, खत व पाणी देण्याच्या पद्धती याविषयी मांडणी करण्यात आली..या वेळी शेतकऱ्यांनी कल्टारचे फायदे-तोटे, आंब्यावर येणारा डिंक्या रोग, गुच्छा रोग तसेच निर्यातयोग्य आंबा उत्पादनाविषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून माहिती घेतली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी पशुधन विकास अधिकारी डॉ. भागवत नाईकवाडे, चंद्रशेखर नाईकवाडे, चंद्रकांत नेहरकर, बळीराम चौरे, भागवत मुंडे आदी उपस्थित होते. कृषी सहायक श्री. चौरे यांनी आभार मानले. राजेंद्र नेहरकर व भागवत मुंडे यांनी सहकार्य केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.