Pesticide Disposal: राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांकडे शिल्लक राहणाऱ्या मुदतबाह्य कीटकनाशकांबाबत तयार झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. कीटकनाशकाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपनीच असेल, असा तोडगा कृषी आयुक्तालयाने काढला आहे..दर वर्षी काही टन व अन्य द्रवरूप निविष्ठांचा पुरवठा विविध कंपन्यांकडून राज्यभर केला जातो. राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांकडे विक्रीविना पडून राहणाऱ्या कीटकनाशकांची मुदत संपल्यानंतर नेमके काय करायचे, असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. काही कंपन्या या निविष्ठा ताब्यात घेत नाहीत. त्याची विल्हेवाट विक्रेत्याने लावावी, असे कंपन्यांना वाटते. तर, विल्हेवाटीच्या खर्चाबाबत कंपन्या व विक्रेत्यांमध्ये मतभेद होते. .Expired Pesticides: जुन्या कीटकनाशकांची नव्या पॅकिंगमधून विक्री.यातून कालबाह्य कीटकनाशकांचे साठे काही जिल्ह्यात पडून आहेत. यामुळे विक्रेता वर्ग तणावात होता. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता.१२) कृषी आयुक्तालयाने बैठक बोलावली. निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांच्यासमोर महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइडस्, सिडस् डिलर्स असोसिएशनचे (माफदा) प्रतिनिधी तसेच कीटकनाशके उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची आपापली बाजू मांडली..Paraquat Dichloride Ban: पॅराक्वॉट डाय-क्लोराइडवर देशव्यापी बंदीची तयारी.सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, कंपन्या व विक्रेत्यांनी कीटकनाशकांच्या विल्हेवाटीबाबत सहमतीने निर्णय घेण्यास मान्यता दिली आहे. कीटकनाशकांची वापर मुदत एक्स्पायरी कालावधी संपण्यास सहा महिने उरलेले असताच कंपनीला विक्रेता संपर्क करेल. त्यानंतर कंपनीकडून तो माल परत घेईल व त्याबदल्यात नवा माल देईल. या व्यवहारात विल्हेवाटीचा खर्च कंपनी करेल. .मात्र, मुदत संपण्यास सहा महिने बाकी असताना न कळवता जर विक्रेत्याने माल विक्रीस ठेवल्यास विक्रेता व कंपनीने आपापसात निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर मुदत संपलेला माल कोणत्याही स्थितीत कंपनीने ताब्यात घ्यायचा आहे. परंतु विल्हेवाटीचा खर्च विक्रेता व कंपनीने आपापसांत करावा, असे बैठकीत निश्चित झाले आहे..मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा किंवा विल्हेवाट हे मुद्दे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. यावर कंपन्या व विक्रेत्यांनी सामोपचाराने तोडगा काढला आहे. विल्हेवाटीची जबाबदारी मुख्यतः संबंधित कंपनीवरच राहील.- सुनील बोरकर, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.