Dharashiva News: धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर पवनचक्की विद्युत प्रकल्प उभारले जात असून, नवीकरणीय ऊर्जेमुळे राज्याच्या वीजनिर्मितीत मोलाची भर पडत आहे. पर्यावरणपूरक आणि विकासाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पांबाबत मात्र स्थानिक स्तरावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळतो का, शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला मिळतो का, तसेच प्रकल्प उभारणीदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण आहे का, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे..WINDS Project: ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्रे उभारणार.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पवनचक्की प्रकल्प सुरू असून, संचालन, देखभाल व दुरुस्ती (ऑपरेशन अॅण्ड मेंटेनन्स) साठी कायमस्वरूपी मनुष्यबळाची आवश्यकता असते. पवनचक्की तंत्रज्ञ, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल सहायक, साइट सुपरवायझर, डेटा ऑपरेटर, सुरक्षा रक्षक अशा विविध पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात..Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील .मात्र, यासाठी आवश्यक असलेले आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी व नवीकरणीय ऊर्जाविषयक प्रशिक्षण स्थानिक युवकांना दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कंपन्या व प्रशासनाने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे सुरू करून स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, पवनचक्की प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने जमिनी घेतल्या जात आहेत..अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे, की वार्षिक भाडे अपुरे असून करारातील अटी इंग्रजीत असल्याने त्या समजत नाहीत. काही ठिकाणी दबाव, धमकी व गुंडगिरीच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रोजगार, मोबदला व सुरक्षिततेबाबत ठोस धोरण आखावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.