Nashik News : येवला तालुक्यावर कायमचाच दुष्काळी शिक्का. जिरायती पिकांवर येथील शेतकऱ्यांचे वर्षाचं अर्थकारण. पाऊस आला तर ठीक नाहीतर रब्बी पाहायला देखील कधीकधी मिळत नाही. अनेक भागात तर दिवाळीपासून पाण्यासाठी टँकर सुरू होतात. मात्र, यंदाचा पाऊस स्वप्नांची माती करणारा ठरला. पिके जोमात होती..पिकाची कापणी होऊन दिवाळी गोड होईल. या आशेवर असणारा शेतकरी अतिवृष्टीमुळे पुरता कोलमडून पडला आहे. अंदरसूल, नगरसुल, सावरगाव, पाटोदा, जळगाव व राजापूर अशा सर्वच महसूल मंडळात पिकांची दुर्दशा झाली आहे. पावसामुळे नुकसान होतेच दोन पैसे मिळेल ही, आशा होती मात्र पिकांची दुर्दशा झाल्याने ती ही मावळली, अशी भयावह स्थिती आहे..येवला तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३१ मिलिमीटर इतके आहे. मात्र २७ सप्टेंबरची रात्र येथील शेतकऱ्यांसाठी उध्वस्त करणारी ठरली. एका रात्रीत महिन्याच्या सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त म्हणजेच १५५ मिलिमीटर पाऊस ढगफुटीसारखा बरसला. सर्वत्र ओढून आले एक होऊन शिवारात पाणी शिरले. कुठे पिके पाण्याखाली गेली तर काही पिके आजही पाण्यात आहेत..सोन्यासारख पीक पाण्यात सडत आहे. कुठे पिके वाचली तर ते बाहेर आणायलाही आता महाग आहे. त्यामुळे चिखल तुडवीत आता वाचलेली पिके खळ्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. गरिबी आणि दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या येवला तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्याला अस्मानीच्या संकटाने उध्वस्त केले आहे..Rain Crop Damage : पावसाने खानदेशात हानी.काही ठिकाणी शिवारातील पाणी आटले, तरी कुठे अजूनही शिवारात पाणी आहे. पदरमोड, उसनवारी करून पेरा करून भांडवल मातीआड केले. मात्र पावसाने काहीच ठेवलं नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने दिवाळीचा सण आता असून नसल्यासारखाच आहे, अशा वेदना शेतकऱ्यांच्या आहेत..शिवारात पिके आहेत. मात्र कुठे पाण्याखाली तर कुठे पाण्यात. यात पूर्व भागातील अंदरसूल, नगरसुल या महसूल मंडळातील गावामध्ये पिकांची मोठी नासाडी आहे. पिके हातातून गेलीच; मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर वळणावर आहे. मक्यासारखे हुकमी पीक अद्यापही पाण्यात आहे.बहुतांश ठिकाणी तालुका मका आडवा पडला. तर काही ठिकाण आडव्या पडलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटले आहेत. आकाशाकडे नजर लावून पावसाची वाट पाहणारा येवल्यातील शेतकरी आता पावसामुळेच अडचणीत सापडला आहे. मक्याची कणसे खराब झाल्याने मक्याचा पैसा होणार नाही आणि जनावरांना चारा देखील उरणार नाही अशी परिस्थिती आहे. .येवला तालुक्यात ५१ हजार ९७७ हेक्टरवर मक्याचा पेरा होता. त्यापैकी ४२ हजार ६०५ हेक्टरवर नुकसान पुढे आले आहे. सोयाबीनची पिकाची स्थिती देखील आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने ट्रॅक्टर पण जात नाही. त्यामुळे चिखल तुडवीत ही सोंगलेली सोयाबीन शेताच्या बाहेर डोक्यावर वाहून आणावी लागत आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्याने काढणीपश्चात प्रतवारीवर मोठा परिणाम आहे. तालुक्यात ६ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान असून जवळपास ८० टक्के पेरणी धोक्यात आहे. यासह बाजरी, तूर, भाजीपाला, फळपिकांसह यासह रब्बी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे संंकटांचा डोंगर.कांदा रोपांच्या झाल्या वाती, कष्टाची मातीयेवला तालुक्याचा पूर्व भाग प्रामुख्याने खरीप लालपोळ कांद्याच्या उत्पादनावर आघाडीवर असतो; मात्र यंदा लागवडी उध्वस्त झाल्या आहेत. कांद्याच्या पिकातून पाणी वाहिल्याने व लागवडीत अजूनही पाणी साचून असल्याने लागवडीत नुकसान आहे.मुळे कुजून जात असून काही ठिकाणी रोपांच्या वाती झाल्या आहेत. कृषी विभागाच्या खरीप व लेट खरीप अशा १२ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राला फटका आहे. त्यामुळे तालुक्यातील यापूर्वी झालेल्या खरीप पोळ कांदा व नव्याने झालेल्या लेट खरीप रांगडा कांदा लागवडी पूर्णतः अडचणीत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या कष्टाची माती झाली आहे..पिकनिहाय प्राथमिक नुकसान (क्षेत्र : हेक्टर)मका ४२,६०५बाजरी ५५६सोयाबीन ६,४९६भुईमूग ६३८तूर ८७कापूस २७९कांदा १२,६२५टोमॅटो १३७भाजीपाला ५१२आद्रक १४६डाळिंब १६.लागवड केलेली कांद्याची रोपे फक्त शिवारात हिरवी दिसत आहेत. मात्र खाली मुळे कुजून गेली आहेत. दोन चार दिवसात या लागवडीच्या वाती होतील अशी भीती आहे. २७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने हाहाकार केला. त्यातच दररोज अधून मधून पाऊस होत असल्याने हे संकट कमी होण्याऐवजी वाढत आहे. मातीतील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने कांद्याचे पीक टिकेल असे बिलकूल वाटत नाही.-विजय वडाळकर, बाधित शेतकरी, अंदरसूल, ता. येवला.मका, सोयाबीन आडवी पडली आहे, ती सोंगायला परवडणार नाही. मजुरांच्या शोध घेत आहे पण आता मजूरही मिळत नाही. कुठे मजूर तर घरच्या मंडळींमार्फत हादुप्पट पैसे देऊनही मजूर शेतात यायला तयार नाही. अशी बिकट अवस्था या पावसाने केली.- प्रताप दाभाडे, सरपंच, बोकटे, ता. येवला .उधारी करून बियाणे खते आणली. लागवड केली आता उधारी डोक्यावर आहे; मात्र उधारी परत द्यायला हाताशी पीक नाही. असे नुकसान कधीच पाहिले नाही.- अण्णासाहेब धनगे, बाधित शेतकरी, जयहिंदवाडी, ता. येवला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.