Fertilizer Scam: खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच राज्यात शेतकऱ्यांच्या नावाने युरियाची जादा विक्री दाखवली जात आहे. कृषी विभागाकडून अशा १६ हजार विक्री व्यवहाराची चौकशी चालू केली असून, आतापर्यंत ७८६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. .केंद्र शासनाच्या एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणालीत (आयएफएमएस) खतपुरवठा व विक्री व्यवहाराच्या नोंदी होत असतात. तसेच खत विक्री करताना निविष्ठा विक्रेत्याला ई-पॉस उपकरणाचा वापर बंधनकारक करण्यात आलेला आहे. देशभर युरियाची टंचाई असून खरीप हंगामात टंचाईच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरिया विक्रीच्या संशयास्पद व्यवहारांना आतापासूनच आळा घालण्याची धडपड केंद्रीय खते तसेच कृषी मंत्रालयाकडून चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने कोणत्याही विक्रेत्याने जादा खते विकल्यास अशा व्यवहाराची पडताळणी करा, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.त्यानुसार राज्यात जादा खत विक्रीची आतापर्यंत १६ हजार प्रकरणे आढळली आहेत..Agriculture Department Inspection: कोकण विभागातील खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी हालचाली.कृषी विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की युरियाची विक्री मुख्यत्वे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी व हंगाम मध्यावर आलेला असताना होत असते. परंतु राज्यात काही ठिकाणी आतापासूनच काही शेतकऱ्यांच्या नावे मोठ्या प्रमाणात युरियाची खरेदी झाल्याचे दिसते आहे. बागायती क्षेत्रात किंवा मोठे लागवड क्षेत्र असलेले शेतकरी अपवादात्मकपणे युरियाची जादा खरेदी करू शकतात. परंतु ही संख्या मर्यादित असायला हवी. मात्र खत विक्री प्रणालीत १६ हजारांहून अधिक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने २० गोण्या किंवा त्यापेक्षा जास्त युरिया खरेदी केल्याचे दिसत आहेत. .Agri Service Centers Inspection: राज्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू .त्यामुळे कृषी विभागाकडून अशा व्यवहारांची बारकाईने तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ११ हजार व्यवहार तपासण्यात आले आहेत. या तपासणीच्या आधारे संशयास्पद विक्री व्यवहार शोधले जात आहेत. आतापर्यंत १४०० विक्री व्यवहार संशयास्पद वाटले. यातील गंभीर प्रकरणात निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले जात आहेत.काही प्रकरणात शेतकरी अकारण जादा युरिया खरेदी करीत असल्याचे आढळले आहे. ऐन खरिपात युरिया मिळणार नाही, अशा भीतीपोटी जादा खरेदी होत आहे..मात्र, काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या नावाखाली विक्रेत्यांकडून जादा खत विक्रीचे व्यवहार करीत असल्याचा संशय आहे. अशा प्रकरणांमध्ये संगनमत झाल्याचा ठपका ठेवत विक्रेता व शेतकऱ्यावर पोलिस कारवाई होऊ शकते. परंतु कृषी विभागाकडून एकाही प्रकरणात शेतकऱ्याला कारवाईच्या कक्षेत आणलेले नाही. ‘‘शेतकऱ्यावर कारवाई झाल्यास त्यातून शासन व्यवस्थेविषयी अकारण रोष तयार केला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना वगळून केवळ विक्रेत्यांवर कारवाई करीत आहोत,’’ असे गुणनियंत्रण विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे..मंजूर पुरवठ्याच्या ४४ टक्के युरिया आतापर्यंत उपलब्धराज्यात खरीप हंगामासाठी एकूण १५.५८ लाख टन युरिया पुरवला जाणार आहे. मेपर्यंत ३.९५ लाख टन युरियाचा पुरवठा अपेक्षित होता. परंतु, आतापर्यंत केवळ १.८४ लाख टन पुरवठा झालेला आहे. अर्थात, मागील साठा गृहीत धरून राज्यात ६.९३ लाख टन युरिया उपलब्ध आहे. ही उपलब्धता एकूण मंजूर पुरवठ्याच्या ४४ टक्के इतकी आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.