Washim News : पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यावर यंदा पावसाचा आशीर्वाद जरा जास्तच झाला आहे. खरिपाच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी सप्टेंबरच्या प्रारंभीच वार्षिक सरासरी पावसाची मर्यादा ओलांडली आहे. .त्यात विशेष म्हणजे मालेगाव तालुक्यात सरासरीच्या दीडपट पाऊस झाला असून, सध्या देखील पावसाची धार कायम आहे. त्यामुळे जमिनीतील ओल पुरेशी असली तरी शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. तालुकानिहाय पावसाचे चित्र.Parbhani Rainfall : ऑगस्टमध्ये पाच वर्षानंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस.अधिकृत आकडेवारीनुसार, वाशीम तालुक्याने ७६५.४ मिलिमीटर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९२० मिमी पाऊस नोंदवला आहे. रिसोडमध्ये ६६१.५ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ८७६ मिमी पाऊस घेऊन १३२ टक्के टप्पा ओलांडला आहे. मालेगाव तालुक्यात तब्बल १००२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला असून हा सरासरीच्या १५५ टक्के इतका आहे. .मंगरुळपीरने ६९९.९ मिमी पावसाने सरासरीच्या ११५ टक्के पातळी गाठली आहे, तर मानोरा तालुक्यात ५९७.३ मिमीच्या सरासरीविरुद्ध ७९८.८ मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच १३४ टक्के, कारंजा तालुक्यात ६५९.९ मिमी पावसासह सरासरीच्या १०५ टक्के पातळी नोंदवली आहे. एकूणच जिल्हाभरात ६६५.२ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ८३१.९ मिमी पावसाने १२५ टक्के सरासरी पार केली आहे..खरीप हंगाम धोक्यातसुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले होते. मात्र सततच्या अतिपावसामुळे आता पिकांवर उलट परिणाम दिसू लागला आहे. सोयाबीन, तूर, हळद या प्रमुख पिकांना मोठा फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाणथळ स्थितीमुळे तुरीची झाडे मूळकुज होऊन उधळली आहेत. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार तुरीचे किमान ७५ टक्के नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. .Khandesh Rainfall : अनेक तालुक्यांत १०० टक्क्यांवर पाऊस .सोयाबीनसाठी सध्या महत्त्वाची अवस्था असताना सततचा पाऊस याच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट करू शकतो. हळदीत कंदकुज दिसू लागली आहे. त्यामुळे यावर्षीचा संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सद्यःस्थिती पाहता कृषी विभागाने पिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे मदत प्रस्ताव सादर करण्याची मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांकडून होत आहे..अति पावसाने सर्वच पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे तयार झाली आहेत. तुरीचे जवळपास ७५ टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या उत्पादनातही निम्म्याने घट येण्याची शक्यता आहे. माझ्या भागातील हळद पिकात कंदकुज सुरू झाली आहे. एकूणच खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरेल, अशी भीती आहे.- डाॅ. गजानन ढवळे, प्रगतिशील शेतकरी, शिरपूर जैन, जि. वाशीम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.