Agriculture Tips: डॉ. सचिन महाजन, श्वेता गोसावी, डॉ. सखाराम आघावतांबेरा सततचा पाऊस, ढगाळ हवामान रोगाच्या वाढीस अनुकूल. वाऱ्यामार्फत तांबेरा रोगाचे बिजाणू पसरतात.शेंगा भरण्याच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव. जमिनीलगतच्या पानांवर प्रादुर्भाव आढळून येतो. बाधित पाने पिवळी पडतात. मुख्य शिरेजवळ लहान आकाराचे पिवळसर तांबूस रंगाचे ठिपके जास्त प्रमाणात दिसतात. तीव्रता वाढली की मातकट रंगाचे डाग पानाच्या दोन्ही बाजूस तसेच देठ, कोवळे खोड, फांद्यांवर दिसतात. छोटे ठिपक्यामध्ये तांबूस तपकिरी रंगाची पावडर तयार होते.अकाली पानगळ होते. त्यामुळे शेंगेत दाणे भरले जात नाहीत अथवा बारीक, रोगट व सुरकुतलेले दाणे तयार होतात. .नियंत्रणजमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.फवारणी : प्रति लिटर पाणीप्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिलि किंवाहेक्झाकोनॅझोल (५ टक्के ईसी) १ मिलि किंवाअझॉक्सीस्ट्रॉबिन (१८.२) टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के एससी) संयुक्त बुरशीनाशक १ मिलि.Soybean Crop Damage : सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या.शेंगेवरील करपा (पॉड ब्लाइट)आर्द्र व दमट हवामानात शेंगा भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसतो.अनियमित आकाराचे, मोठे होत जाणारे गडद तपकिरी ठिपके खोड आणि शेंगांवर तयार होतात.शेंगा पिवळ्या पडतात, वाळतात. कोवळ्या शेंगांवर प्रादुर्भाव झाल्यास दाणे भरत नाहीत.बाधित शेंगेतील बी रोगट, काळपट, वजनाने हलके होऊन उगवण क्षमता नष्ट होते..नियंत्रणफवारणी : प्रति लिटर पाणीटेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के ईसी) १.२५ मिलि किंवापायरॅक्लोस्ट्रॉबीन (२० टक्के डब्लूजी) १ ग्रॅम किंवाटेब्युकोनॅझोल(१० टक्के) अधिक सल्फर (६५ टक्के डब्लूजी) संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम.कॉलर रॉट (बुंधा सड)जमिनीत अतिरिक्त पाणी जास्त काळ साठून राहिल्यास प्रादुर्भाव दिसतो.जमिनीलगत झाडाच्या खोडावर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते. या ठिकाणी खोड ओलसर होऊन खोडाची साल सडते. सडलेल्या भागावर बुरशीची मोहरीसारखी बीजाणूफळे तयार होतात.झाड पिवळे पडून सुकते..नियंत्रणजमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.रोगट झाडे उपटून जाळून नष्ट करावीत किंवा प्लॅस्टिकच्या पोत्यात भरून शेताच्या बाहेर खड्ड्यात पुरून टाकावीत. कारण रोगकारक बुरशी अवशेषांच्या आश्रयाने जीवंत राहून प्रसारास कारणीभूत ठरते.१० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडी प्रति लिटर पाण्यात मिसळून मुळाजवळ आळवणी करावी..कोरडी मूळ व खोड सड (चारकोल रॉट)ज्या भागात कमी पाऊसमान आहे त्या भागात प्रादुर्भाव दिसून येतो.जमिनीलगतच्या खोडावर व मुळांवर काळपट डाग.मूळ, खोडाची साल सडल्यामुळे अन्न पुरवठा होत नाही. परिणामी पाने पिवळी पडतात, रोपे सुकतात.नियंत्रणरोगट झाडे उपटून जाळून नष्ट करावीत..Soybean Crop Damage : सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या. पिवळा मोझॅकरोपावस्थेपासून पीक पक्वतेच्या कालावधीत प्रादुर्भाव दिसतो.विषाणूचा प्रसार पांढरी माशीद्वारे होतो.पानांवर हिरवे, पिवळे अनियमित चट्टे दिसतात. पाने पिवळी दिसतात. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.झाडाची वाढ खुंटते, फुले व शेंगांची संख्या घटते..नियंत्रणरोगग्रस्त झाडे उपटून जाळून नष्ट करावीत.बांधावरील तणे, पूरक वनस्पतींचा नाश करावा.पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे (हेक्टरी २५ ते ३०) लावावेत.पांढऱ्या माशीचे नियंत्रण ः प्रति लिटर पाणीडायफेन्थ्यूॅरॉन (४७.८ टक्के एससी) १ मिलि िकंवाअॅसिटामिप्रिड (२५ टक्के) अधिक बायफेनथ्रीन (२५ टक्के डब्ल्यूजी) संयुक्त कीटकनाशक ०.५ ग्रॅम िकंवापायरीप्रॉक्सिफेन (१० टक्के)अधिक बायफेनथ्रीन (१० टक्के ईसी) संयुक्त कीटकनाशक २ मिलि.पानांवरील बुरशीजन्य ठिपकेआर्द्र, दमट हवामान रोगास पोषक. प्रसार बियाणे, रोगट अवशेष आणि हवेमार्फत होतो.फुलोरा अवस्थेनंतर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. पान, खोड आणि शेंगांवर तपकिरी- करड्या रंगाचे, गोलाकार अथवा विविध आकाराचे, पिवळे वलय असणारे ठिपके दिसतात.ठिपक्याचा मध्यभाग गळून जातो, पानांवर छिद्रे दिसून येतात. ठिपके आकाराने वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. पानाचा भाग करपलेला दिसतो.पानातील कर्बग्रहण क्रिया मंदावते, शेंगांचे पोषण व्यवस्थित होत नाही..नियंत्रणफवारणी : प्रति लिटर पाणीटेब्युकोनॅझोल (३८.३९ टक्के एससी) १.२५ मिलि किंवाअझॉक्सिस्ट्रॉबीन (१८.२ टक्के)अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के एससी) संयुक्त बुरशीनाशक १ मिलि किंवाअझॉक्सिस्ट्रॉबिन (८.३ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६६.७ टक्के डब्लूजी) संयुक्त बुरशीनाशक ३ ग्रॅम- डॉ. सचिन महाजन ९४२११२८३३३ (सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र,कृषी संशोधन केंद्र,कसबे डिग्रज, जि. सांगली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.