Sangli News: अगोदरच दुष्काळानंच पिचलोय, त्यात आता अतिवृष्टीची भर पडली आहे. नव्याने उभं राहणं आमच्या स्वभावात आहे. दुष्काळ, अतिवृष्टीतही एक नवा आशेचा किरण शोधतोय. शेतात कष्ट करून येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यासाठी नव्या जोमाने उभा राहतोय, द्राक्ष शेती आमच्यासाठी आशावाद आहे, असे जतमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी दीपक हत्ती सांगत होते..दुष्काळानं पिचलेला जत तालुका. दुष्काळ, आणि शेतीवर आलेलं संकट. अशा परिस्थितीतही तालुक्यातील शेतकरी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर शेती फुलवत आहे. याच जतमधील दीपक यांच्या कुटुंबाने अकरा एकरांवर द्राक्ष बाग फुलवली आहे. अनुष्का, एस. एस. एन., सिद्धगोल्ड बुलेट आणि माणिक चमन या वाणांच्या द्राक्षांची लागवड त्यांनी केली आहे..Grape Farming : संकट असतंच, पण हार मानून कसं चालंल!.गेल्या बारा वर्षांपासून निर्यातक्षम दर्जाचे द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत. आखाती देशासह चीन मध्ये द्राक्षाची निर्यात केली जाते. त्यांचे वडील नागाप्पा, बंधू सचिन आणि आई सौ. निर्मला असं अख्खं कुटुंब शेतीत राबतं. ‘दुष्काळ असो वा अतिवृष्टी, वेलीवर येणाऱ्या घडांमधून आम्हाला जगण्याची ऊर्जा मिळते,’ असं हत्तींचं हसतं उत्तर त्यांची चिकाटी सांगून जातं..यंदा मे पासूनच पाऊस त्यातच सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने फळछाटणी उशिरा झाली, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तरीही दीपक खचले नाहीत. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत गुणवत्तेला प्राधान्य दिलं. त्यामुळे बाजारपेठेत दर्जेदार द्राक्षांची मागणी कायम राहिली. दुष्काळ, अतिवृष्टी, बदलतं हवामान या सगळ्यांवर मात करून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन हाती घेत आहेत. द्राक्ष बाग म्हणजे संकटावर मात करण्याच्या ऊर्जेचं प्रतीक आहेत..Grape Farmers : द्राक्ष बागांसाठी विशेष पॅकेजसाठी प्रयत्नशील .प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष पिकवणे तसं जिकिरीचं. संकटामुळे उत्पादन खर्च वाढतो. पण अशा परिस्थितीत कष्ट आणि इच्छाशक्तीमुळे येणाऱ्या संकटावर मात करणे सोपे होते. आपत्तीमुळे द्राक्षाची निर्यातच कधीच थांबवली नाही. यंदाही द्राक्षाची निर्यात करणार आहेत. निसर्गाच्या आघातानंतर सरकारकडून आधाराची अपेक्षा करणारा शेतकरी सध्या आशेचा उजेड शोधतोय..सरकारची मदतीची प्रतीक्षा न करता शेतात पुन्हा नव्या जिद्दीने कष्ट करून द्राक्षाची निर्यात करण्यासाठी जोमाने शेतात राबू लागले आहेत. द्राक्ष शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून करू लागलो आहे. त्यामुळे संकटातही दोन पैसे कमी मिळाले तरी, आर्थिक गणित काटावर येते. पण त्यातून मिळणारे समाधान महत्त्वाचे आहे..निसर्गाचा आघातातून मिळतोय नवा रस्तानिर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी अनेक अडचणी येतात. याच अडचणीतून मार्ग काढत नव्या जोमाने फळ छाटणी घेतली आहे. दरवर्षी एका वेलीला अंदाजे चाळीस घड ठेवले जायचे. आता एका वेलीला वीस घड ठेवण्याचे नियोजन आत्तापासूनच केले आहे. घडांची संख्या कमी असल्याने तो घड कसा दर्जेदार, मण्याचा आकार, त्याची रंग, गोडी, घडाचे वजन याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने फळ छाटणी केल्यापासून काटेकोर नियोजन केल्यास ते शक्य आहे. निसर्गाचा आघातामुळे एक नवी वाट तयार होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.