EU India FTA Signing Date: भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (FTA) २७ जानेवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. विशेष म्हणजे या करारातून शेती क्षेत्राला वगळण्यात आल्याचे वृत्त युरोपियन माध्यमाने (European media) दिले आहे. युरोपियन युनियन २७ जानेवारी रोजी भारतासोबतचा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यापार कराराला औपचारिकपणे अंतिम स्वरुप देईल. यासाठी युरोपियन युनियनचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्लीत येतील. २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावेळी युरोपियन युनियनचे सर्वोच्च नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे..सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी बंद दाराआड झालेल्या बैठकीत युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी युरोपियन संसदेच्या सदस्यांना सांगितले आहे की, या महिन्यात करारावर स्वाक्षरी होईल आणि यातून शेतीला वगळण्यात आले आहे..या करारातून काही गोष्टी वगळण्यात आल्या असली तरीही हा करार म्हणजे युरोपियन युनियनच्या व्यापार संबंधांसाठीचा खूप मोठा संकेत असल्याचे उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी म्हटले आहे. या अंतिम करारात शेती क्षेत्राचा समावेश नसेल, हे आधीपासूनच स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले. .India EU FTA: भारत-युरोपियन महासंघात मुक्त व्यापार करारावर चर्चा.हा करार युरोपियन युनियनचा आजपर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण ज्यामुळे जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के लोकसंख्या असलेल्या भारतीय बाजारपेठेत त्याचा प्रवेश होणार आहे. .India-New Zealand FTA: न्यूझीलंडमधून आयात वाढणार?, काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकरी चिंतेत, केंद्रावर आश्वासन मोडल्याचा आरोप .वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी नुकतीच ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्याशी प्रस्तावित भारत- ईयू कराराच्या निमित्ताने सविस्तर चर्चा केली होती. आता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँतोनियो कोस्टा २७ जानेवारी रोजी भारतात येणार आहेत. .भारतासाठी शेती हा नेहमीच एक संवेदनशील मुद्दा राहिला आहे. कारण या क्षेत्रात ४४ टक्के मनुष्यबळाला रोजगार मिळतो. या पार्श्वभूमीवर अन्नधान्याच्या बाजारपेठांमध्ये युरोपियन युनियनला अधिक प्रवेश देणे हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. त्यासाठी युरोपियन युनियनने आधीच पुष्टी केली होती की दुग्धजन्य पदार्थ, साखर यासह अनेक शेती उत्पादनांना यातून वगळण्यात आले आहे..नऊ वर्षांनंतर वाटाघाटी सुरु झाल्याभारत आणि युरोपियन युनियनने जून २०२२ मध्ये मुक्त व्यापार करार, गुंतवणूक संरक्षण करारासाठी ९ वर्षांहून अधिक कालावधीनंतर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या होत्या. बाजारात प्रवेश देण्याच्या मुद्यावरून २०१३ मध्ये वाटाघाटी थांबल्या होत्या. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा युरोपियन युनियन सोबतचा द्विपक्षीय व्यापार १३६.५३ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा होता. त्यात ७५.८५ अब्ज डॉलर्स निर्यात आणि ६०.६८ अब्ज डॉलर्स आयातीचा समावेश होता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.