Pus Prakalp News Marathi: पुसद परिसरातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या अप्पर पूस प्रकल्पात उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांची पदे रिक्त आहेत. त्याच्या परिणामी कालव्यांची अपेक्षित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ‘टेल’पर्यंत पाणी पोहोचत नाही. त्याचा फटका सिंचन क्षमतेला बसत आहे. .माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत वनवार्ला येथील पूस धरणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या धरणाची सिंचन क्षमता ९ हजार ३४९ हेक्टर असून, आतापर्यंत जास्तीत जास्त सात हजार हेक्टरपर्यंत सिंचन होऊ शकले. ‘टेल’ असलेल्या गुंज आणि सवना या भागात अजूनही सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत..Chikotra Water Project: समन्यायी पाणीवाटपाचा पथदर्शक प्रकल्प.पूस प्रकल्प जुना असला तरी सुरुवातीच्या काळात दोन्ही डावा उजव्या कालव्यांचे काम उत्तम करण्यात आले. अलीकडे निधीअभावी सया दोन्ही कालव्यांची परिस्थिती खालावलेली आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भगदाड पडले असून, झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी वाहू शकत नाही. दोन्ही कालव्यावर टाकण्यात आलेले सिमेंट पाइप (एचपीसी) फुटले आहेत..Canal Water: कालव्याचे पाणी पिकांना मिळेना; शेतकरी अडचणीत.पूस प्रकल्पाच्या कालव्यांची परिस्थिती चांगली नाही. लघु वितरिकांच्या दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे. मात्र, कालवे फुटल्याने शेतात पाणी शिरत असल्याने पिकांचे नुकसान होते. मुख्य म्हणजे पाणी व्यवस्थापनावर नियोजन करणे आवश्यक आहे.रतिराव राऊत, शेतकरी, आरेगाव, ता. पुसद.शाखा अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने सर्व भार उपविभागीय अभियंत्यावर पडत आहे. ही पदे भरल्यास योग्य प्रकारे सिंचन व्यवस्था कार्य करू शकेल. या वेळी टेल परिसरात सिंचनाचे ६०० हेक्टर क्षेत्र वाढविण्यात आले. कालव्यांची दुरुस्ती झाल्यास पूर्ण क्षमतेने प्रकल्प राबवता येईल.नंदकिशोर बोहणे, प्रभारी उपविभागीय अभियंता, पूस प्रकल्प.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.