Maharashtra Farmers Issue: शासन निर्णयानुसार गाव नकाशावरील शासकीय पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे सात दिवसांच्या आत काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु जालना जिल्ह्यात अद्यापही अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यावर अतिक्रमणे कायम असून शेतकऱ्यांना शेती कामासाठी ये जा करण्यास मोठ्या अडचणीचे झाल्याची बाब बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून अधोरेखित केली आहे..महसूल व वन विभाग यांच्या शासन शुद्धिपत्रक २५ मार्च २०२६ अनुषंगाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना राबविण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे तत्काळ सर्व तहसीलदारांना प्रकरणे निकाली काढण्यासाठी निर्देश द्यावे, अशी मागणी करण्यात आली. पावसाळा जवळ येत असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असून शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे, या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे..Panand Road: हिंगोलीतील ६२५ किलोमीटर पाणंद रस्त्यांसाठी प्रस्ताव.प्रमुख मागण्यापाणंद रस्त्यावरील सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस द्या.सात दिवसांच्या आत अतिक्रमण न काढल्यास सक्तीने काढा.पाणंद रस्त्याचे तात्काळ मोजणी व सीमांकन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्या.अतिक्रमण करणाऱ्यावर आवश्यक ती कारवाई करून संबंधित फार्मर आयडी आधार ब्लॉक करण्याची प्रक्रिया तात्काळ करावी..Agriculture Irrigation Water: गिरणा, तापीतून आवर्तनाने दिलासा.तहसीलदार व उपविभागीय अधिकारी प्रांत यांच्याकडे प्रलंबित प्रकरण निकाली काढावी.जबाबदारी निश्चित करून कामाचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे.पाणंद रस्ते मोकळे करून प्रत्यक्ष काम सुरू करावी.क्षेत्रीय समिती स्थापन करून दर महिन्याला बैठक व समितीस कालबद्ध कार्यक्रम द्यावा.हद्द निश्चितीच्या वेळी ग्रामपंचायत पंचायत समिती व इतर उपलब्ध निधी प्रदान करण्यात यावा.शासन निर्णयानुसार प्रति किलोमीटर १५ लक्ष निधी उपलब्ध करून तात्काळ कामे सुरू करा आदी मागण्या करण्यात आल्या.https://youtu.be/pNpYri1q6W0?si=Efoi2R4Oo20Mm_4s.महाराष्ट्र बळीराजा पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुका स्तरावर सर्व संबंधित विभागांची (महसूल, ग्रामपंचायत, कृषी विभाग इ.) संयुक्त आढावा बैठक तत्काळ आयोजित करण्यात यावी. प्रलंबित प्रस्तावांची यादी तयार करून निश्चित कालमर्यादा ठरवावी.अतिक्रमण काढण्याच्या कारवाईस गती देण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत. अन्यथा आंदोलन छेडणार आहे.नारायण लोखंडे, अध्यक्ष बळीराजा फाउंडेशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.