Farm Road News Nashik: पिढ्यान्पिढ्या अतिक्रमित राहिलेल्या पाणंद, पायवाट आणि शेतरस्ते खुले करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला गती मिळत आहे. या मोहिमेत आतापर्यंत १० हजार ३१९ रस्त्यांची सरकार दरबारी नोंद करण्यात आली असून, ११७ रस्त्यांवरील वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणे हटवून ते शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत..गावपातळीवर शेतात जाण्यासाठीचे पाणंद रस्ते आणि पायवाटांवर दीर्घकाळापासून अतिक्रमणे झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही ठिकाणी वैयक्तिक वाद, तर काही ठिकाणी भावकीतील मतभेदांमुळे रस्ते बंद करण्यात आले होते..Baliraja Farm Road Scheme: बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामांना गती द्यावी : पालकमंत्री पाटील.परिणामी, शेतमाल वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाने पुढाकार घेत ऑगस्टपासून विशेष मोहीम राबविली. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमधील १९ हजार ३२० पाणंद व शेतरस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले..Farm Road Encroachment: पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे कायम .यात १६ हजार २४७ प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूंनी सामोपचाराचा मार्ग स्वीकारत शेतात जाण्यासाठी संमतीपत्र देण्यात आले; तर १३८ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मोजणी व सीमांकन पूर्ण करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वाद अल्पावधीत निकाली निघाले असून, शेतकरी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे..९४५१ रस्त्यांना सांकेतांकमोहिमेंतर्गत पाणंद, शेतरस्ते आणि गावरस्त्यांची शासन दफ्तरी नोंद घेताना त्यांना स्वतंत्र सांकेतांक देण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यात अतिक्रमण रोखण्यास मदत होणार असून, अतिक्रमण झाल्यास ते तातडीने हटविणे प्रशासनाला सुलभ होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.