Parbhani News: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात गुरुवार (ता. १७) ते सोमवार (ता. २२) या कालावधीत पाणंद रस्तेविषयक मोहीम राबविण्यात येणार आहे. .दरम्यान, यंदाच्या ऑगस्ट अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यातील २६२ शिव, शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आली असून या रस्त्यांची लांंबी ३०२.४ किलोमीटर आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली..Panand Road : ग्रामीणमधील ६५४ पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण काम पूर्ण .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत गुरुवार (ता. १७) ते महात्मा गांधी जयंती (ता. २ ऑक्टोबर) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविली जाणार आहे..या अंतर्गत शिव, पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे, पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. शिव, पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, निस्तार पत्रकावर पाणंद, शिव रस्त्याची नोंद घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे..Panand Road : सहमतीमुळे देवबावाडी पाणंद रस्ता झाला खुला .जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ अखेर अतिक्रमित व जिओ टॅग केलेल्या रस्त्यांची संख्या ३३६ असून या रस्त्यांची लांबी ४१० किलोमीटर आहे. त्यापैकी सर्व ९ तालुक्यांतील एकूण ३०२.४ किलोमीटर लांबी असलेले २६२ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत..परभणी जिल्हा शेत-पाणंद रस्ते स्थितीतालुका अतिक्रमित शेतरस्ते अतिक्रमण काढलेले रस्ते प्रलंबित प्रकरणेपरभणी ६६ ५१ १५जिंतूर १०० ८६ १४सेलू १६ १६ ००मानवत १६ १४ २.पाथरी १२ ६ ६सोनपेठ १५ १५ ००गंगाखेड ४७ २४ २३पालम ३२ २३ ९पूर्णा ३२ २७ ५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.