Maratha Reservation: मुंबईतील रस्ते रिकामे करा, परिस्थिती सामान्य करा
Mumbai High Court Order: मंगळवारपर्यंत (ता. २) आझाद मैदान वगळता अन्यत्र आंदोलकांना प्रवेश नाकारण्यात यावा. मंगळवारी दुपारपर्यंत शहरातील रस्ते रिकामे करावेत आणि परिस्थिती सामान्य करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १) दिले. तसेच सरकारनेही तातडीने पावले उचलावीत, असेही निर्देश दिले.