Mangrove Conservation: अलिबाग : सागरी पर्यावरण संतुलनात कांदळवनाची भूमिका फार महत्त्वाची आहे. कांदळवनाच्या संरक्षणासाठी यावर अवलंबून असणाऱ्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध होणे तितकेच गरजेचे आहे. कांदळवनातील रोजगारनिर्मितीसाठी १० वर्षांपूर्वीपासून ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका’ योजना राबवली जाते. या योजनेला २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत रायगड जिल्ह्यातील कांदळवनात पर्यटनवाढीसाठी ठोस उपाययोजना राबवल्या जाणार आहेत..राज्य सरकारच्या कांदळवन प्रतिष्ठानने २० सप्टेंबर २०१७ पासून राज्यातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ ही योजना सुरू केली. ही योजना गावांमध्ये स्थापन झालेल्या ‘कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’मार्फत राबवली जाते. राज्य सरकारने ६ नोव्हेंबर रोजी या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला..Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था.जिल्ह्यात या योजनेतून २८ कांदळवन व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्या असून, आतापर्यंत ४९० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. मध्यंतरात कोरोना आणि निधीअभावी या योजनेला अपेक्षित गती मिळाली नव्हती. वन विभागाच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील कांदळवन परिसरात पर्यटनवाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचा फायदा घेण्यासाठीच योजनेला मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता..Mangrove Conservation : लोकसहभागातून साधले कांदळवनांचे संवर्धन.पर्यटनवाढीसाठी सुवर्णसंधीजिल्ह्यात जवळपास १२०.९७ चौ. किमी एवढे विस्तीर्ण कांदळवन क्षेत्र आहे. समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या या कांदळवनांमध्ये निसर्ग पर्यटन वेगाने बहरत आहे. विविध प्रजातींच्या कांदळवनांमध्ये दुर्मिळ प्रजाती टिकून आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कांदळवन पर्यटन हे नवे आकर्षण ठरत असून, वेगवेगळे प्रयोग करण्याचीही संधी उपलब्ध आहे. पुढील कालावधीत या संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या जाणार असल्याची माहिती कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल नितीन पाटकर यांनी दिली..नव्या ठिकाणांचा होणार विकासकांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना आणि कांदळवन प्रतिष्ठान निसर्ग पर्यटनांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये ‘कांदळवन निसर्ग पर्यटन’ हा जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबवला गेला आहे. याप्रमाणे पेण तालुक्यात दादर, बोरी, पाणजे तसेच अलिबाग तालुक्यात शहापूर, गणेशपट्टी, माणकुळे, नागाव, रेवदंडा येथे कांदळवन सफारीसाठी योग्य ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. येथेही कांदळवन व्यवस्थापन समित्या स्थापन करून स्थानिकांसाठी उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत..कांदळवन निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिकांची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. येथील नागरिकांमध्ये मतपरिवर्तन झाले असून, शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे या सुविधा उभारता येतील.-सिद्धेश कोसबे, अध्यक्ष, दिवेआगर निसर्ग पर्यटन गट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.