Buffalo Farming Management: शेतकरी नियोजन । म्हैसपालन शेतकरी : श्रीकांत सूर्यकांत देशमुख गाव : मुरूड, ता. जि. लातूरएकूण जनावरे : ३० (म्हशी ११)एकूण शेती : वीस एकर.मुरूड (ता. जि. लातूर) येथील तरुण शेतकरी श्रीकांत सूर्यकांत देशमुख यांच्या कुटुंबीयांचा बंदिस्त म्हैसपालनाचा व्यवसाय आहे. घरची पारंपरिक शेती असल्याने श्रीकांत यांना बालपणापासून शेतीची आवड निर्माण झाली. पारंपारिक शेतीला जोडधंदा म्हणून दहा वर्षांपूर्वी त्यांनी एका गाईपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर बंदिस्त म्हैसपालन करत व्यवसाय वाढविला. सध्या त्यांच्याकडे पाच मुऱ्हा व सहा जाफराबादी म्हशी आहेत. याशिवाय गोठ्यात ५ गाई आणि २ बैलांसह लहान मोठी मिळून सुमारे तीस जनावरे आहेत. गोठ्यातील म्हशींपासून दररोज ८० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते. उत्पादित दुधाची खासगी डेअरीला विक्री केली जाते..म्हैसपालनामध्ये वेळेवर दर्जेदार चारा, खुराक व पुरेशा पाण्याची उपलब्धता आणि आरोग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. गोठ्यातील जनावरांना नियमित अंघोळ घालून स्वच्छता राखली जाते. तसेच गोठ्याची नियमित स्वच्छताही केली जाते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. दैनंदिन चारा, पाणी, खुराकासह स्वच्छतेवर भर देत आरोग्य उत्तम राखत व्यवसाय यशस्वी केला आहे. यामुळे दर्जेदार दूध उत्पादन मिळत असल्याचे श्रीकांत देशमुख सांगतात..Buffalo Breeding : म्हशींमधील प्रजनन व्यवस्थापनाचे नियोजन.गोठ्यात पैदाशीवर भरदुग्धव्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले. सुरुवातीला खरेदी केलेल्या म्हशींच्या संगोपन करून पैदाशीवर भर देण्यात आला. त्यातून हळूहळू गोठ्यातील म्हशींची संख्या वाढत गेली. म्हशींसाठी बंदिस्त गोठ्याची उभारणी केली आहे. देशमुख कुटुंबाची मुरुड गावाजवळ वीस एकर शेतजमीन आहे. त्यात उसासह हंगामी पिकांची लागवड केली जाते. एकूण क्षेत्रापैकी काही क्षेत्र चारा पिकांच्या लागवडीसाठी राखीव ठेवले जाते. म्हैसपालन व्यवसायामध्ये श्रीकांत यांना चुलते चंद्रकांत व रमाकांत यांच्यासह चुलत भाऊ उमाकांत, उदयकांत व रविकांत यांची मदत मिळते..खाद्यावरील खर्चावर नियंत्रणम्हशींचे आरोग्य उत्तम राहून दूध उत्पादनात सातत्य राखण्यासाठी वेळेवर चारा आणि पाणी देण्याचे नियोजन केले जाते. प्रत्येक जनावराला पुरेसा चारा व पाणी दिले जाते. त्यासाठी जनावराच्या दूध देण्याच्या क्षमता आणि शारीरिक आकारमानुसार चाऱ्याचे प्रमाण निश्चित केले जाते. म्हशींसाठी उसाचे वाडे, मका, घास, ज्वारीचा कडबा, सोयाबीनचे गुळी घरच्या शेतीतून उपलब्ध होते. त्यामुळे बाहेरून खरेदी करण्याची गरज पडत नाही. घरच्या शेतामध्ये चारा पिकांची लागवड, मूरघास निर्मिती केल्यामुळे बाहेरून अतिरिक्त खाद्य खरेदी करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे खाद्यावरील खर्चात मोठी बचत झाली आहे..प्रतिदिन म्हशींना सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दहा किलो घास, वाडे, वैरण व गुळी दिली जाते. त्यासोबतच तीन किलोप्रमाणे पशुखाद्यही दिले जाते.बंदिस्त शेडमध्ये चारा खाण्यासाठी उभारलेल्या सिमेंटच्या गव्हाणीमध्येच चारा टाकला जातो. दैनंदिन चाऱ्यामध्ये ओला व सुका चारा दिला जातो. सर्व चाऱ्याची कुट्टी केल्यानंतरच तो जनावरांना दिला जातो.म्हशींचे संगोपनासाठी उभारलेल्या बंदिस्त शेडसमोर काही जागा मोकळी सोडण्यात आली आहे. चारा साठवणुकीसाठी ३० बाय २५ फुटांचे शेड उभारले असून त्यात सर्व चारा साठविला जातो. त्यामुळे जनावरांना पुरेशा चाऱ्याची कायम उपलब्धता होते..चारा पिकांची लागवडचाऱ्यासाठी ज्वारी लागवड केली जाते. त्यातील उपलब्ध कडबाही साठविला जातो. सध्या पंधरा हजार कडब्याच्या पेंढ्या चाऱ्यासाठी उपलब्ध आहेत. शेडमध्ये सोयाबीनची गुळी देखील साठविली जाते. वीस गुंठ्यावर घास, तर दोन एकरांत मका लागवड केली आहे. मक्यापासून दरवर्षी मुरघास तयार केला जातो. मुरघास तयार करताना वर्षभर पुरेल, असे नियोजन केले जाते..Shortest Buffalo: साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची 'गिनेस बुक'मध्ये नोंद.पिण्यासाठी शुद्ध पाणीम्हशींना शुद्ध पाणी देण्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेचा पिण्याचा पाण्याचा हौद बांधला आहे. त्यातून जनावरांना चोवीस तास शुद्ध आणि पुरेसे पाणी उपलब्ध होते. या हौदामध्ये म्हशींना पाणी पिण्यासाठी साधारण २५ कप्पे केलेले असून त्यातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी ऑटोमॅटिक व्यवस्था केली आहे. या कप्प्यामधून म्हशी जितके पाणी पितात तेवढेच पाणी त्यात पुन्हा येऊन साठते..आरोग्य व्यवस्थापनयशस्वी पशुपालनासाठी खाद्य, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. गोठ्यातील जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी म्हशींचे दररोज निरिक्षण केले जाते. काही वेळा म्हशी आजारी असल्यास चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. किंवा हालचालीत बदल दिसून येतो. म्हशींच्या रोजच्या दिनचर्येत काही बदल दिसून आल्यास तत्काळ पशुसंवर्धन अधिकारी व पशुवैद्यकांना तपासणीसाठी बोलवले जाते. त्यांच्या सल्ल्यानुसार लसीकरण आणि औषधोपचार केले जातात. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने तातडीने उपचार करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे गोठ्यातील जनावरे जास्त काळ आजारी राहत नाहीत. आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहते. दूध काढणीवेळी कासेची स्वच्छता ठेवण्यावर भर दिला जातो. जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी पशुवैद्यकाकडून नियमितपणे विविध साथ रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. जंतनाशकाची मात्रा दिली जाते..व्यवस्थापनातील बाबीगोठ्यातील कामांना दररोज सकाळी पाच वाजता सुरुवात होते. सुरुवातीला गोठ्यातील शेण मागे ओढून जनावरांना खुराक ठेवला जातो.त्यानंतर हाताने दूध काढून ते विक्रीसाठी मुरूड येथील खासगी डेअरीला पाठविले जाते.सामान्यपणे मोकळा चारा दिल्यानंतर म्हशींकडून चाऱ्याची नासधूस जास्त होते. त्यासाठी बंदिस्त शेडमध्ये सिमेंटच्या गव्हाणी तयार केल्या आहेत. त्यामुळे चाऱ्याची होणारी नासधूस कमी होण्यास मदत झाली आहे. शिवाय म्हशींना चारा खाणे सोयीचे झाले आहे..गोठ्यातील दररोज जमा होणारे शेण एका खड्ड्यात संकलित केले जाते. दरवर्षी गोठ्यातून सुमारे ५० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यापैकी काही शेणखताचा वापर घरच्या शेतीमध्ये केला जातो. तर उर्वरित शेणखताची विक्री केली जाते. शेणखत विक्रीमधून दरवर्षी साधारण तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.- श्रीकांत देशमुख : ९६०४७५६२२२(शब्दांकन : विकास गाढवे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.