Nashik News: २०२२-२३मध्ये लाल कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आक्रोश होता. अखेर राज्य सरकारने २०० क्विंटल मर्यादेत प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यात काही शेतकरी अपात्र ठरले होते. त्यांनाही अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. .अखेर प्रस्तावांची फेरछाननी होऊन १२ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यात १४ हजार ६६१ शेतकरी पात्र ठरले. त्यांना अनुदानापोटी २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ रुपये निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढला. मात्र दिवाळीच्या सणाला देखील अनुदान मिळाले नाही. दोन महिने उलटूनही अनुदान वितरणाचा गोंधळ कायम आहे. याबाबत कुणीही स्पष्ट माहिती देत नसल्याची स्थिती आहे..१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक आणि नाफेड केंद्राकडे कांदा विकलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा झाली. पहिल्या टप्प्यातही टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित झाले. या पैकी ७/१२ उताऱ्यावरील नोंदीच्या कारणामुळे हजारो शेतकरी अपात्र ठरविले गेले..Onion Prices: राजस्थानात कांद्याचे भाव ५० टक्क्यांनी घसरले, शेतकऱ्यांनी ४ ट्रॉली कांदा नदीत फेकला.त्यांना अनुदान मिळण्याची मागणी होती. अखेर अपात्र शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची फेरछाननी करण्यात आली. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी शासननिर्णय निघाला. पुढे सुधारित आदेश ४ सप्टेंबर रोजी आले. मात्र अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे. अनुदान खात्यावर जमा न झाल्याने सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे..जिल्हा उपनिबंधक म्हणतात, ‘माहिती घेतो, खात्री करतो’यापूर्वी आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले होते. मात्र आता फेरछाननीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अनुदान जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची नावे निश्चित असतानाही दोन महिने उलटूनही खात्यावर अनुदान वर्ग झालेले नाही. नाशिकमध्ये १८ कोटींचे अनुदान वितरण अद्याप लालफितीत आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्याशी संपर्क साधला असता ‘अनुदान लवकरच देण्यात येईल’ असे सांगून त्यांनी अधिकचे बोलणे टाळले. मात्र ‘गेल्या दोन महिन्यांपासून अनुदान वितरण का रखडले, ते कोशागारात पडून आहे’, असे विचारल्यानंतर ‘खात्री करतो’ असे सांगत संवाद थांबविला..Onion Crisis: पावसामुळे पीक येण्याची शक्यता नसल्याने कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर.‘सरकार, यंत्रणा नाचवते कागदी घोडेतीन महिन्यांपूर्वी जाहीर झालेले अनुदान दिवाळीसारख्या सणाला मिळाले असते, तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असती. मात्र ‘अनुदान मंजूर झाले, पण हाती काहीच नाही, अशीच परिस्थिती आहे. सरकार आणि यंत्रणा फक्त कागदोपत्री घोडे नाचवत आहेत,’ अशा तीव्र प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत..सत्ताधाऱ्यांकडून गतिमान कारभाराचा डंका पिटला जातो; परंतु अडीच महिन्यांपूर्वी जाहीर केलेले अनुदान अद्याप वितरित केले गेले नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे न देऊन सरकारने शेतकऱ्यांचा दिवाळीचा आनंद हिरावून घेतला. सरकारच्या कामातील दिरंगाईचा जाहीर निषेध करतो.भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.अनुदान मिळण्यासाठी दोन वर्षे पाठपुरावा केला. अखेर अनुदान जाहीर झाले. मात्र ते दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाले असते तर सण गोड झाला असता. मात्र सरकारचे दुर्लक्ष आणि प्रशासनाचा अनागोंदी कारभार अडचणीचा ठरला आहे. आता तरी रब्बी हंगामासाठी भांडवल म्हणून अनुदान खात्यावर तत्काळ वर्ग करावे.सचिन आहेर, संचालक, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती.मंजूर अनुदान पात्र जिल्ह्यातील त्या-त्या जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याचे वितरण का झाले नाही याची माहिती नाही. याबाबत संबंधित जिल्हा उपनिबंधक सांगू शकतील. संबंधित निधी कोषागारात वर्ग आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पुढे देण्यात आल्या आहेत.विकास रसाळ, पणन संचालक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.