Gadchiroli News: नवरगाव तालुक्यातील परिसरात हत्तींच्या कळपाने शेतात घुसून धुडगूस घातल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवरगाव येथील शेतकरी दादाजी नानाजी दशमुख यांच्या शेतात रविवारी (ता. १) मध्यरात्री हत्तींच्या कळपाने प्रवेश करत उभ्या पिकांची नासधूस केली..हत्तींच्या पायदळी मका, भाजीपाला तसेच तूर पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय मका पिकासाठी वापरण्यात आलेली रासायनिक खते फेकून देत शेतातील साठवणूकही उद्ध्वस्त करण्यात आली..Wildlife Crop Damage: वन्य प्राण्यांमुळे ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान.गडचिरोली तालुका मुख्यालयापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील नवरगाव परिसरात अलीकडे हत्तींचा वावर वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. .Wildlife Attack: वन्यप्राण्यांचे हल्ले तातडीने रोखा: कौठकर.रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वारंवार होणाऱ्या हत्तींच्या हल्ल्यांमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत नसून, जीवितहानीचीही भीती व्यक्त केली जात आहे.0.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वन विभाग व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.