Wildlife Conflict: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील कोलझर (ता. सावंतवाडी) गावात ‘ओंकार’ हत्तीने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. लोकवस्तीनजीकच्या केळी, सुपारी, नारळाच्या झाडांचे मोठे नुकसान हत्तीकडून सुरू आहे..हत्तीच्या मुक्तसंचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ओंकार’ हत्ती गेले काही दिवस गोव्याच्या हद्दीत होता. तीन-चार दिवसांपूर्वी नदी ओलांडून तो पुन्हा सिंधुदुर्गच्या हद्दीत दाखल झाला आहे. गेले दोन दिवस हा हत्ती कोलझर गावामध्ये आहे..Elephant Attack Deaths: चंद्रपूर, गडचिरोलीत ३०-३२ हत्तींचा धुमाकूळ, ४ मृत्यू, शेतीचं नुकसान, विशेष कृती दल स्थापनेची वडेट्टीवारांची मागणी.काळोख पडताच हत्ती थेट लोकवस्तीनजीक येत आहे. गावातील भात, नाचणी पिकांचे मोठे नुकसान हत्तीकडून सुरू आहे. नारळ, सुपारी, केळी या फळपिकांचेदेखील नुकसान हत्तीकडून सुरू आहे..Wild Animal Attack: एप्रिलमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू, पीक नुकसानीची १,६६१ प्रकरणे, वनमंत्र्यांची माहिती.शेतकरी लक्ष्मण बोंद्रे, अनंत पास्ते, अविनाश पास्ते, मनोजकुमार देसाई, हेमंत देसाई, जयप्रकाश देसाई, संदीप देसाई, शैलेश डुबळे यांच्या बागायती हत्तीने अक्षरशः होत्याच्या नव्हत्या केल्या आहेत..तळकट ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेंद्र सावंत यांनी वनविभागाने ‘ओंकार’ हत्तीला तिलारी परिसरात नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अन्य पाच हत्तींचा कळप मोर्ले, परमे या भागात आहे. ‘ओंकार’ हत्ती या कळपात जात नसल्याने वनविभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.