Solapur News: नवीन वीज कनेक्शनसाठी आता ग्राहकांना महावितरणच्या चकरा मारण्याची गरज उरणार नाही. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेतच वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यपद्धतीत मोठे बदल केले आहेत. १ जानेवारी २०२६ पासून ही नवी ऑनलाइन व्यवस्था कार्यान्वित झाली आहे..या नव्या प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता येणार असून, कोणत्या टप्प्यावर कामाला विलंब होत आहे, हे वरिष्ठ स्तरावरून ट्रॅक करणे शक्य होणार आहे. नव्या नियमानुसार, जिथे पायाभूत सुविधा (खांब, वायर इ.) आधीच उपलब्ध आहेत, तिथे खालीलप्रमाणे वीज जोडणी देणे बंधनकारक आहे..Agriculture Electricity Connection: शेतीला दिवसा वीज कधी?.त्यात ग्रामीण भागासाठी अर्ज केल्यापासून फक्त १५ दिवसांत, शहरी भागासाठी अर्ज केल्यापासून ७ दिवसांत, ज्या ठिकाणी विजेचे खांब उभारणे किंवा तारा ओढणे अशी पायाभूत कामे आवश्यक आहेत. .Electricity Connection : मराठवाड्यात वर्षभरात सव्वा लाख नवीन वीज जोडण्या.तिथे ही कालमर्यादा ९० दिवसांची असेल. विशेष म्हणजे यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ‘ऑनलाइन’ करण्यात आली आहे..दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राहणार वॉचनव्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेमुळे नवीन वीज कनेक्शनच्या कामात कमालीची गतिमानता येणार आहे. जर एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून कामात दिरंगाई झाली, तर ती सिस्टिममध्ये त्वरित दिसून येईल, नेमक्या कोणत्या टप्प्यावर फाइल अडकली आहे, हे स्पष्ट होणार असल्याने कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.