Nashik News : नाशिक तालुक्यातील शिलापूर येथे ऊर्जा विभागाच्या केंद्रीय विद्युत संशोधन संस्था संचलित नाशिक इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब स्थापन होत आहे. या प्रकल्पाच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. .यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाल्याने शासनाने त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली.तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच्याकडेही भूमिहीन तरुणांना रोजगार देण्याची मागणी केली..शिलापूर येथे बुधवारी (ता. १०) केंद्रीय मंत्री खट्टर यांच्या शुभहस्ते इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थित होते. स्थानिक शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन शेती होते. आता भूमिहीन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आहिरे यांनी मंत्री खट्टर यांची भेट घेतली. हा मुद्दा त्यांनी निदर्शनास आणून दिला..Land Acquisition Scam : भूसंपादन अधिकाऱ्यानेच वाढविले १४० कोटी.प्रयोगशाळेच्या उभारणीकरिता शिलापूर मधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. सुरुवातीला शेतकऱ्यांनी जमीन संपादनास विरोध केला असता तर प्रकल्पास अडचणी आल्या असत्या. मात्र शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद देत जमिनीचे संपादन करण्यास कुठलाही विरोध केला नाही. .त्यामुळेच ही प्रयोगशाळा निर्माण होत आहे. परंतु आजवर वर्षानुवर्षे ज्या शेतीवर शेतकरी उदरनिर्वाह करत होते.ती शेती गेल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार आहिरे यांनी मंत्री खट्टर यांच्याकडे केली..Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात .नोकरी देण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यायाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले. प्रयोगशाळेकरिता मोठ्या प्रमाणात स्थानिक शेतकरी वर्गाचे भूसंपादन झालेले आहे. परिणामी येथील शेतकरी भूमिहीन झालेले आहे.तरी या गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुणांना प्रयोगशाळेमध्ये रोजगारासाठी नोकरी देण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी केली..प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले.त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदारनिर्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. तरी शासनाने याकडे लक्ष घालून अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला प्रयोगशाळेत नोकरी देऊन त्यांचा प्रश्न सोडवावा.- सरोज आहिरे, आमदार, देवळाली मतदारसंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.