Latur News: उदगीर तालुक्यात सात जिल्हा परिषद गट तर चौदा पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रशासनाने तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली..वाढवणा बु. जिल्हा परिषद गटाअंतर्गत हंडरगुळी व वाढवणा बु. हे दोन पंचायत समिती गण आहेत. हंडरगुळी गणात हंडरगुळी, हाळी, मोरतळवाडी, वंजारवाडी, रुद्रवाडी, आनंदवाडी, वाढवणा गणात वाढवणा, वाढवणा खु., डांगेवाडी, सुकणी, चिमाचीवाडी, आडोळवाडी, सोमनाथपूर जिल्हा परिषद गटात गुडसूर व सोमनाथपूर हे दोन पंचायत समिती गण आहेत. गुडसूर गणात गुडसूर, डोंगरशेळकी, हाकनाकवाडी, कल्लूर, हिप्परगा, डाऊळ, खेर्डा, खु. तर सोमनाथपूर गणात तोंडार, लोणी, सोमनाथपूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे..Local Body Elections: युती-आघाडीवर अजूनही सस्पेन्स.नळगीर गटात नळगीर व नागलगाव गणांचा समावेश असून, नळगीर गणात नळगीर, देऊळवाडी, कोदळी, मांजरी, चोंडी नावंदी, नागलगाव गणात नागलगाव, बोरतळा तांडा, चवळे तांडा, भीमा तांडा, सोमला काशीराम तांडा, मारुती तांडा, वागदरी, धडकनाळ, बोरगाव बु. टाकळी , कासराळ, पिंपरी, अवलकोंडा सुमठाणा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निडेबन गटाअंतर्गत शिरोळ व निडेबन पंचायत समिती गणांचा समावेश आहे. .Local Body Elections: सांगलीत किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत.शिरोळ गणात शिरोळ, जानापूर, गुरधाळ, कौळखेड, कुमदाळ उ., चांदेगाव, तोंडचिर, लिंबगाव, मल्लापुर, तर निडेबन पंचायत समिती गणात निडेबन, मादलापूर, माळेवाडी शेल्लाळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लोहारा गटात लोहारा व कुमठा खुर्द या दोन गणांचा समावेश असून, लोहारा गणात लोहारा, तिवटग्याळ, मलकापूर, हैबतपूर तर कुमठा खुर्द गणात कुमठा खुर्द क्षेत्रफळ, हंगरगा, इस्मालपूर, होनिहिप्परगा, उमरगा मन्ना, किनीयल्लादेवी, एकुर्का रोड यांचा समावेश आहे..गणांमधील गावांचा याप्रमाणे समावेश...हेर गणात हेर, डिग्रस, करडखेल, वायगाव तर देवर्जन गणात देवर्जन, धोतरवाडी, हनमंतवाडी, चिघळी, भाकसखेडा, शंभू उमरगा, गंगापूर, करवंदी, सताळा बु. ग्रामपंचायतीचा समावेश आहे. दावणगाव गणात दावणगाव, बनशेळकी, करखेली, कुमदाळ, अरसनाळ, नेत्रगांव, जकनाळ तर तोगरी गणात मोघा, रावणगाव, बेलसकरगा, धोंडीहिप्परगा, तादलापूर, बामणी ग्रामपंचायतीचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.