Farm Loan Waiver Exemption: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेला आचारसंहितेतून सवलत दिली जावी, अशा विनंतीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. .महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. आचारसंहिता लागू असल्यामुळे जूनपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची अंमलबजावणी होणार काय ?.Farm Loan Waiver: आचारसंहितेमुळे कर्जमाफीला अडथळा नाही : मुख्यमंत्री फडणवीस.याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. तथापि निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत कर्जमाफीच्या अंतिम निकषांवर विचारविनिमय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आस, तोपर्यंत कर्ज वसुली स्थगितीची मागणी, मुख्यमंत्री विजय काय निर्णय घेणार? .कर्जमाफीच्या योजनेचा ३० ते ४० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल. तर यामुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे २७ हजार कोटी रुपयांचा बोजा पडण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीपर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्जे थकीत होती, त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाचा भरणा केला आहे, त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. याचा सुमारे २० लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे..कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ३० जूनपूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट बॅंक खात्यात वर्ग होणार काय, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.