Solapur News : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगर परिषद व ४२ नगरपंचायतींच्या सदस्य व अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ नगर परिषदा व १ नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुका यशस्वी व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य समन्वय राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. .जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकपूर्व आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख, जिल्हा सह आयुक्त योगेश डोके यांच्यासह सर्व नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी व पोलिस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. .Local Body Elections: आता दिवाळीनंतरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोग.जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, “जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे समजून घेतल्या पाहिजेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे कामकाज पार पाडून निवडणुका शांततामय, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडल्या जाव्यात. .Sugar Factory Crushing Season : यंदाचा गळीत हंगाम २५ नोव्हेंबरपर्यंत लटकला; राज्य सरकारचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र .कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांनी संयुक्त बैठक घेऊन समन्वय साधावा, तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच माहिती संकलन प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी निर्देश दिले. बैठकीच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी जिल्ह्यातील ११ नगर परिषद व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती दिली. पुढील काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले..४९९ मतदान केंद्रेजिल्हा सहआयुक्त योगेश डोके यांनी माहिती देताना सांगितले की, बार्शी, अकलूज, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी आणि दुधनी या नगर परिषदांसह अनगर नगरपंचायत या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत एकूण १५२ प्रभागांतून २८९ सदस्य निवडले जाणार असून, यासाठी ४९९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी व १२ सहाय्यक अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.